आष्टी (प्रतिनिधी)
"४० वर्षापूर्वी सासु व सुना, मालक व गडी यांच्यात काय व कसे नाते होते आणि आज यांच्यात कसे नाते आहे.पुर्वी भजन कीर्तनास गर्दी नसे आज कीर्तनात बसायला जागा मिळत नाही.एकूणच आध्यात्मिक प्रचंड प्रेम निर्माण करत त्याविषयी गोडी निर्माण करण्याचे अध्यात्मिक कार्य वै. संत मदन महाराज यांनी केलेले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले.
आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथे वै.संत मदन महाराज बिहाणी यांनी प्रारंभीत केलेल्या ५६ व्या.अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. सप्ताहात सात दिवस ह.भ.प. संतोष महाराज मोरे यांच्या मधुर वाणीतुन संत तुकाराम महाराज जीवन चरित्र संगीत कथा झाली.काल्याचे कीर्तन प्रसंगी यशभैय्या आजबे, ह.भ.प.निवृत्ती महाराज बोडखे, संतोष महाराज मोरे,मोहन महाराज आमटे,कोल्हे महाराज, भागचंद झांजे, माजी चेअरमन संजय गाढवे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,बाळासाहेब पिसाळ, सेवानिवृत पोलीस अधिकारी विठ्ठलराव नरवडे,संतोष मुटके सर,पवार महाराज,पांडुतात्या झिंजुर्के,शिवाजी धोंडे,अशोक देसाई महाराज,पाटील महाराज, संपत दानवे,हंसराज मगर, अनिकेत चांगुणे,देवीदास कुटे, कृष्णा महाराज बहिरवाल,बबन मगर,माणिकराव मुळीक, अशोक तळेकर,बाबासाहेब मुळीक सर,शामआबा तळेकर, बबन रांजने,अंकुश तळेकर,प्रेम पवळ,एम.बी.तळेकर आदि राजकीय,सामाजिक,धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.काल्याचे प्रसादाची पंगत बाबासाहेब मुळीक,अशोक कोकरे,आमोल मुळीक,सतिष मुटके,श्रीकांत झांजे,परसराम तळेकर,विकास मुळीक,महादेव झांजे,संतोष तळेकर या जणांनी दिली.ह.भ.प.बबन महाराज पुढे म्हणाले की,वै.संत मदन महाराज यांच्या हिमालया एवढ्या अध्यात्मिक कार्याचे कौतुक करताना घाटा पिंपरी येथील काल्याचे कीर्तनात हजारो भाविक भक्तांच्या समोर आध्यात्मिक कार्याचे चिंतन आणि संत सज्जनांचे विचार पेरताना ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल कीर्तनातील अभंगाचे समयोचित निरूपण करीत होते.प्रारंभी वै.संत मदन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत आशीर्वाद घेण्यात आले.ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल पुढे म्हणाले, संत मदन महाराज यांच्या रुपाने हिमालयाच्या उंचीचा महात्मा आपल्या परिसरात फिरलेला आहे.महाराष्ट्राचे दुदैव आहे की महात्मा,संत भक्त जीवंत असेपर्यत कळत नाही ते गेल्यावर कळतात.वै.संत मदन महाराज यांचा विषय तो झाला नारायण असे त्यांचे झाले होते. भगवंताच्या आश्रयाला जाणाऱ्याचे बंधन गळुन पडते, असेही महाराज म्हणाले.वै.संत मदन महाराजांच्या बालपणीच्या अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.ते म्हणाले की,वै. संत मदन महाराजांच्या लहानपणीच आईवडील देवाघरी गेले.संत मदन महाराजांवर दु:खाचा डोंगर कोसळला नंतर संत मदन महाराजांनी विरक्तवृत्तीने घरादाराचा नातेवाईकांचा त्याग करून श्री क्षेत्र पंढरीस जाऊन त्यांनी श्रीसंत भगवान शास्त्री धारूरकर,श्रीसंत गोपाळशास्त्री
गोरे,श्रीसंत सद्गुरू कृष्णदास लोहिया,श्रीसंत धुंडा महाराज देगलुरकर यांचे सत्संगात राहून त्यांची अनेक वर्ष सेवा केली.पंढरीत श्रीसंत कृष्णदास लोहिया महाराजांकडून त्यांनी ज्ञान घेवुन लोहिया महाराजांनी
पंढरपुर येथे चालविलेल्या अन्नछत्र कामात संत मदन महाराज यांनी मदत केली.संत मदन महाराजांनी अन्नदानाची महती लोहिया महाराजांकडून जाणून घेतल्यानंतर श्रीक्षेत्र पंढरीत मदन महाराजांनीही अन्नछत्र सुरू केले.संत मदन महाराजांनी पंढरीत चातुर्मासात गोरगरीब वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय केली.अन्नदान, ज्यांना कपडे नसतील त्यांना कपडे;पैसे वाटत करीत असत. वारक-यांना महाराजांनी धोतर मागुन ही त्यांचे शिष्य आनंदा महाराजांना धोतर देण्याचे सांगितले.हरिभाऊ पाटील महाराज म्हणाले कपडे संपलेत. हे ऐकुण मदन महाराज उठले न अंगावरील नवे धोतर फेडुन पंचा नेसले आणि त्या वारकऱ्यास धोतर दिले असे हे संत मदन महाराज वैराग्याचे महामेरू होते.त्यांचे कर्णासारखे औदार्य त्यांचेकडे होते.श्रीसंत मदन महाराजांची साधी राहणी,संत विचार,स्वभाव काटकसरीचा होता.आपल्या शरीरावर कपडे घालन्यातही ते काटकसर करीत असत.साधे धोतर,अंगावर पंचा,फक्त कीर्तनाचे वेळी अंगात सदरा, डोक्याला फेटा बांधीत,त्यांनी देहाची कधीही तमा बाळगली नाही.श्रीसंत मदन महाराजांनी आयुष्यात प्रामुख्याने दोन कामे केली.एक अन्नदान दुसरे हरिनाम,वै.संत मदन महाराज भक्ती,ज्ञान, वैराग्याचे संगम होते.पहाटे उठून रात्री १२ वाजेपर्यंत ते सतत परमार्थ करीत.महाराज पायी चालत असुन किंवा बैलगाडीत असोत किंवा बसमध्ये असोत ते अखंड नामस्मरणातच असत.संत मदन महाराजांची अवस्था जागृती, स्वप्नी पांडुरंगच होती.संत मदन महाराजांनी परमार्थात कधीही तडजोड केली नाही. वैराग्याचे महामेरू संत मदन महाराजांनी स्वत:च्या अंगावर कपडे न घालता समाजाला मायेची भक्तीची ऊब दिली. संत मदन महाराज हा वृक्ष भक्तीच्या फळाने लवुन गेलेला होता. संत मदन महाराजांचे अंतःकरण अपार कारूण्याने,अथांग प्रितीने डबडबलेले होते.संत मदन महाराज भक्तीने वाहणारी गंगा होती.श्रीसंत मदन महाराजांचे चरित्र शब्दांकित करणे शक्य नाही.महाराज एवढे महान होते.ते त्यांचे मोजमाप करताच येणार नाही.
चौकट
--------
भक्ती ज्ञान
वैराग्याचा संगम
-------------
वै.मदन महाराज यांनी आयुष्यभर सर्वसामान्य वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली वारकरी संप्रदाय वाढवा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले ज्ञानभक्ती आणि वैराग्याचा संगम म्हणजे संत मदन महाराज होते असा उल्लेख करताच प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रतिसाद मिळाला.
------------------
हजारो भाविकांची
मांदियाळी
-------------------


आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथील काल्याचे किर्तन सोहळ्यामध्ये घाटा पिंपरी सह आष्टी तालुका यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. संत मदन महाराजांच्या हिमालय एवढ्या धार्मिक कर्तृत्वाला नतमस्तक होत आशीर्वाद घेण्यात त्यांनी धन्यता मानली.शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद घेऊन भक्तांना ऊर्जा मिळाली.
------------------
0 टिप्पण्या