
आष्टी (प्रतिनिधी )
दिवसेंदिवस आपल्या शाळांची गुणवत्ता वाढत चालली आहे.
विद्यार्थ्यांनी आतापासून पुढच्या शिक्षणाची चांगली तयारी करावी आपल्याला काय
व्हायचे ते आत्ताच ठरवावे. खेळाकडे लक्ष द्यावे.खेळामुळे देखील नोकरीत भरपुर संधी
आहेत.सकाळी उठून अभ्यास करावा तसेच व्यायाम करावा. जिवनात सुखाचे दिवस पाहण्यासाठी
विद्यार्थ्यांनी चांगले कष्ट करावे, मन लावुन अभ्यास करावा.भावी जीवनात चांगले काम
करावे.शिक्षकांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवतील असे विद्यार्थी घडावेत,गुणवत्ता
व निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.. भविष्यात सुखाच्या दिवसांसाठी
विद्यार्थ्यांनी भरपूर कष्ट करावेत असे प्रतिपादन संस्थाअध्यक्ष माजी आ. भीमराव
धोंडे यांनी कडा येथे केले. आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या प्रांगणात
कार्यक्रमासाठी वाॅटरप्रुफ मंडप उभारण्यात आला होता त्यामुळे मंगळवारी दिवसभर पाऊस
सुरू असुन देखील भर पावसात गुणवंत सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. शेतकरी
शिक्षण संस्था, आनंद चॅरिटेबल संस्था,छत्रपती शाहु एज्युकेशन सोसायटी व किसान
शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी व बारावीच्या गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे
प्रा.डॉ.महेमुद पटेल आणि कार्यालयीन कर्मचारी दिगंबर बोडखे यांच्या सेवापुर्ती
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर युवा नेते अजयदादा
धोंडे,अभयराजे धोंडे,सामाजिक कार्यकर्ते बाबुलाल भंडारी,शेतकरी शिक्षण शिक्षक
पतसंस्थेचे चेअरमन राजेश धोंडे,पत्रकार उत्तम बोडखे,ह.भ.प.पांडुरंग महाराज कर्डीले,
ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख, डॉ.चंद्रकांत गोसावी, सरपंच चंदनशिव,
सेवानिवृत्त सैनिक हांगे,प्राचार्य डॉ.बापुराव धोंडे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,
प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, ठकाराम दुधावडे,दिव्यांग कर्मचारी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना माजी आ. भीमराव
धोंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी चांगली गुणवत्ता प्राप्त करुन जिवनात
नावलौकिक करावे तसेच आई- वडील,आपले गाव आणि संस्थेचे नांव मोठे करावे. दहावी
परिक्षेत शंभर टक्के गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी आहेत.ते खरोखरच कौतुकास पात्र
आहेत. अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ज्यांचे निकाल कमी आहेत अशा
मुख्याध्यापकांनी पुढील वर्षी विद्यार्थ्यांकडून चांगला अभ्यास करून घ्यावा व आपणही
१०० टक्के निकाल लावुन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावा, गुणवंत विद्यार्थ्यी
कोठेही गेला तरी त्याने बौद्धिक दृष्टीने आपले नाव काढले पाहिजे. चांगल्या शैक्षणिक
गुणवत्तेबद्दल आष्टी येथील पंडीत नेहरु विद्यालयाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी
कौतुक केले. आपापल्या शाळेची गुणवत्ता वाढविल्यास विद्यार्थी आपोआप वाढतील,पालक
तुमच्याकडे प्रवेशासाठी चकरा मारतील.विद्यार्थ्यांसाठी संस्था अनेक उपक्रम राबविते.
लवकरच कडा किंवा आष्टी येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.आष्टी
विधानसभा मतदार संघातील जनतेने मला कमी वयात पहिल्यांदा विधानसभेत पाठविले होते
त्यामुळे मी त्यांच्या पाल्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणासाठी शेवटपर्यंत
काम करीत राहणार आहे.शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतकरी शिक्षण संस्था सुरू केली
आहे.विद्यार्थ्यांनी मार्क कमी पडले तरी नाराज होऊ नका पुन्हा जिद्दीने अभ्यासाला
लागा आणि पुढील परिक्षेत चांगले गुण मिळवून जिवनात यशस्वी व्हा. भविष्यात काय
बनायचे ते आताच ठरवा,कष्ट करणाऱ्याला यश मिळते. विद्यार्थ्यांनी वर्षे भर आणि
परिक्षा काळात वेळापत्रका नुसार अभ्यास कसा करावा, दिवस किती शिल्लक राहिले
आहेत.विषय नियोजन कसे करावे याची सविस्तर माहिती माजी आ. भीमराव धोंडे सांगितली.
आजच्या गुणवंतांनी पुढील पाच सहा वर्षांनी मी असा अधिकारी बनलो आहे किंवा या
क्षेत्रात कार्यरत आहे हे पेढे वाटून आम्हाला सांगावे म्हणजे आम्हालाही खरोखरच आनंद
होईल.यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सेवानिवृत्ती बद्दल प्रा. डॉ.
महेमुद पटेल व पत्रकार दिगंबर बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना
प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी सांगितले की,महाविद्यालयात सर्व प्रकारच्या
शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. करिअर कट्टा, विविध ठिकाणी सेवेत असलेल्या
कर्मचाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र,
विद्यापीठाचे पेपर तपासणी केंद्र.४० वर्षांपुर्वी तालुक्यात मोजक्या शाळा होत्या.
परंतु मा. आमदार भीमराव धोंडे यांनी पहिल्यांदा विधानसभा सदस्य झाल्यानंतर
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,वरिष्ठ महाविद्यालये सुरु
करुन शिक्षणाची सोय केलेली आहे. आनंदराव धोंडे महाविद्यालयात आजचा २७ वा सत्कार
समारंभ आहे.यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा. शिवदास विधाते,माऊली
बोडखे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस. एन.वाघुले,उपप्राचार्य
डॉ. भास्कर चव्हाण,उपप्राचार्य डॉ.बापु खैरे,प्रा.डॉ.सज्जन गायकवाड, प्रा.डॉ.महेमुद
पटेल, प्रा.मंडलीक यांची भाषणे झाली.संस्थेमधून प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या
विद्यार्थ्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ४ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन
संस्था अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे यांच्या हस्ते
गौरविण्यात आले.यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक,शिक्षक, मुख्याध्यापक व कडा येथील
ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रा.शैलजा कुचेकर यांनी तर उपस्थितांचे आभार
उपप्राचार्य डॉ.संभू वाघुले यांनी मानले.
0 टिप्पण्या