
आष्टी (प्रतिनिधी)
राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राजमाता पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ चौंडी येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.
ही बाब आपल्यासाठी निश्चितच भूषणावह आहे.प्रशासनामार्फत या बैठकीचे काटेकोरपणे
नियोजन करण्यात आले आहे.यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांची अत्यंत
शिस्तबद्ध रितीने अंमलबजावणी करावी.दिलेली जबाबदारी चोखपणे बजावत बैठक यशस्वीपणे
पार पाडण्याचे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे यांनी
दिले.मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची गैरसोय होणार नाही याची
दक्षता घ्यावी असेही ना.प्रा.राम शिंदे यांनी यावेळी सांगितले. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ जामखेड तालुक्यातील चौंडी येथे होणाऱ्या
मंत्रीमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा सभापती ना.प्रा.राम शिंदे यांनी घेतला.
याप्रसंगी ते बोलत होते.बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,जिल्हा पोलीस अधीक्षक
राकेश ओला,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अपर जिल्हाधिकारी
बाळासाहेब कोळेकर,जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे,अपर पोलीस
अधीक्षक प्रशांत खैरे,निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, उपविभागीय अधिकारी नितीन
पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव,जिल्हा परिषदेचे बांधकाम
दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीसांगर चौधरी, तहसीलदार गणेश माळी, गटविकास
अधिकारी शुभम जाधव,पोलीस निरीक्षक महेश पाटील,जामखेड पंचायत समितीचे उपअभियंता
बागुल, शाखा अभियंता लिमजे, शासकीय नोंदणीकृत ठेकेदार परिवंत गायकवाड यांच्यासह
सर्व विभाग प्रमुखाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभापती ना.प्रा.राम शिंदे
म्हणाले की, चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी प्रशासनाने अत्यंत
सूक्ष्मपणे व काटेकोरपणे नियोजन केले आहे. बैठकीसाठी विविध समित्यांची स्थापना करुन
अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे जय्यत तयारी अंतीम टप्प्यात असल्याने
सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
चौकट
--------
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त चौंडी येथे ६ मे २०२५ रोजी होणाऱ्या
मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी येणाऱ्या सर्व व्हीव्हीआयपी, लोकप्रतिनिधी व सर्व
पदाधिकारी यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व रस्त्यांची कामे
प्रगतीपथावर आहेत.येत्या ६ मे पुर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधीत
अधिकाऱ्यांनी सांगितले.
------------------
चौकट
---------
चोंडीत ६००
व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार होणार आहे.दि. ६ मे रोजी
राज्यमंत्रिमंडळाची पहिल्यांदा होणार बैठक होणार ---------------- महाराष्ट्र विधान
परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे यांनी चोंडी येथे बैठकीचा आग्रह धरला होता.दि.२९
एप्रिल रोजी ही बैठक होणार होती.नंतर ६ मे तारीख ठरली आहे. राजमाता पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त चोंडी येथे ६ मे २०२५ रोजी राज्य
मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.या बैठकीसाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्यासह अवघे
मंत्रिमंडळ दाखल होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना
जबाबदारीचे वाटप करत चोंडी येथे तयारीचा आढावा घेतला. विधान परिषदेचे सभापती
ना.प्रा.राम शिंदे यांनी चोंडी येथे बैठकीचा आग्रह धरला होता. दि.२९ एप्रिल रोजी ही
बैठक होणार होती नंतर ६ मे २०२५ तारीख ठरली. जिल्हा प्रशासना कडून ६०० व्हीव्हीआयपी
आणि इतर दोन हजार लोकांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री,मंत्री आणि व्हीव्हीआयपी यांच्या भोजनाची व्यवस्था बचत गटातील
महिलांकडे देण्यात आली आहे. यामध्ये खास अहिल्यानगर जिल्ह्यातील पदार्थ बनविले
जाणार आहेत.
0 टिप्पण्या