महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि उत्तर प्रदेश केसरी बंटी खाॕन यांच्यात ३ लाख रु.ची दवंडीची कुस्ती होणार ........... १६ पुर्वनियोजीत कुस्त्या तर दोन महिला मल्लच्या कुस्त्या ............. आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ.बाळासाहेब आजबे उपस्थित राहणार
आष्टी (प्रतिनिधी)
? आष्टी तालुक्यातील कडा येथील मौलालीबाबा देवस्थान यात्रेनिमित्त
मंगळवारी महाराष्ट्रातील नामांकीत पैलवानांच्या चितपट कुस्त्यांचा जंगी हंगामा
होणार आहे. सोमवार व मंगळवार असा दोन दिवस याञा उत्सव संपन्न होतोय.ही यात्रा आठ
दिवस भरणार आहे.आज सोमवारी अतिशय उत्साहात आणि शोभेच्या दारुची अतिषबाजीत छबीना
मिरवणुक होणार आहे.ऐक्य, अन् बंधुत्वाचे प्रतीक मौलालीबाबा यात्रेत 'सर्वधर्मसम
भावाचे दर्शन घडते. ३ लाख रुपयांच्या रंगतदार आणि अंतीम कुस्तीने यात्रा उत्सवाची
शानदार सांगता होणार आहे.महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि उत्तर प्रदेश केसरी
बंटी खाॕन यांच्यात ३ लाख रु ची दवंडीची कुस्ती होणार आहे.मनोज पवार (आष्टी) आणि
अनुज चौधरी (दिल्ली) यांची २ लाख रु.ची, मयुर कणसे (आष्टी) आणि लाला गुजर (दिल्ली)
यांच्यात १ लाख ५० हजार रु. ची,महाराष्ट्र चॕम्पियन सौरभ काकडे (आष्टी) आणि
महाराष्ट्र चॕम्पियन राम कांबळे (पुणे) यांची १ लाख रु ची, अमोल दिंडे (आष्टी) आणि
अमित कुमार (दिल्ली) यांच्यात ५१ हजार रु.ची , महाराष्ट्र चॕम्पियन पृथ्वीराज वनवे
(जामखेड) आणि महाराष्ट्र चॕम्पियन आदर्श सोरटे (पुणे) यांच्याता ४१ हजार रु.ची
कुस्ती तर ३१ हजार इनामाच्या दोन,२१ हजार रु. च्या इनामाच्या सहा,११ हजार रु.
इनामाची एक कुस्ती तर कर्जतची राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकणारी महिला पैलवान सोनाली
मंडलिक आणि सातारा येथील महाराष्ट्र चॕम्पियन वेदांतिका पवार यांची ४१ हजार रु. तर
अहिल्यानगर येथील अशिया सुवर्ण पदक विजेती पैलवान धनश्री फड आणि महाराष्ट्र
चॕम्पियन पैलवान आश्लेशा बागडे (सांगली) यांच्यात ३१ हजार रु.ची नियोजित कुस्ती
होणार आहे.या हांगाम्याचे बहारदार, रोमहर्षक निवेदन धाराशिवचे प्रसिद्ध निवेदक
राजाभाऊ देवकाते हे करणार असुन पंच म्हणून महाराष्ट्र केसरी सईद चाऊष हे काम पाहणार
आहेत.या हंगाम्यात १६ पुर्वनियोजीत कुस्त्या तर दोन महिला मल्लांच्या कुस्त्या होत
आहेत.चितपट कुस्त्यांनी फड गाजणार आहे. यावेळी आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव
धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर, माजी आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह कुस्तीप्रेमी
उपस्थित राहणार आहेत.
दवंडीची कुस्ती तीन लाख रुपये
-----------------
तीन लाख
रुपयाच्या रंगतदार आणि अंतीम कुस्तीने यात्रा उत्सवाची शानदार सांगता होणार
आहे.जंगी कुस्ती स्पर्धेच्या फडाने कड्याच्या मौलालीबाबा यात्रेत उत्साह आष्टी
तालुक्यातील मौलालीबाबा देवस्थानाचा यात्रा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात
भाविक भक्तांच्या तसेच कुस्तीप्रेमी,मल्लांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
भक्तांच्या श्रद्धेला पावणारे म्हणून मौलालीबाबा देवस्थानाकडे पाहिले जाते. गेल्या
कित्येक वर्षाची या यात्रा उत्सवाची परंपरा आहे.कडा शहरसह परिसरातील लाखो भाविकांनी
दर्शन घेतले.दरवर्षी विविध भागातील विविध समाजाचे लोक याठिकाणी अत्यंत श्रद्धायुक्त
भावनेने नतमस्तक होण्यासाठी येतात. यंदाच्या यात्रोत्सवाच मोठी आरास करण्यात आली
होती.यात्रेतील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायिकांनी मोठी गर्दी केली होती.बच्चे
कंपनींच्यासाठी करमणुकीची अनेक साधने आणि वस्तूंची रेलचेल होती.विशेष म्हणजे
सर्वधर्मीय आणि सर्व जाती धर्म पंथांच्या भाविक भक्तांनी मौलालीबाबा देवस्थानाच्या
ठिकाणी नतमस्तक होऊन स्वतःला धन्यता मानली.या यात्रा उत्सवातील प्रमुख वैशिष्ट्य
म्हणजे राज्यभरातील आलेल्या पैलवानांनी कुस्तीप्रेमी ग्रामस्थांच्या इच्छा पूर्ण
होणार आहे. १५ किलो वजन गटापासून ते १०० किलो वजन गटापर्यंतच्या विविध पैलवानांच्या
कुस्त्या डोळे दिपवणा-या ठरणार आहेत. अनेक कुस्त्या निकाली निघणार तर काही समांतर
सोडविण्यात येतील.यावेळी विभागून बक्षीस देण्यात येतील. तर शेवटची दवंडीची कुस्ती
तीन लाख रु.ची होणार आहे.मौलालीबाबा यात्रा उत्सवानिमित्त मंगळवारी चितपट
कुस्त्यांचा जंगी सामना कुस्ती प्रेमींना पहावयास मिळणार आहे. महाराष्ट्राचा रांगडा
खेळ समजल्या जाणाऱ्या कुस्तीच्या डाव प्रतिडावाने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे
पारणे फिटणार आहे. हालगीचा आवाज, प्रेक्षकांची तुफान गर्दी,आडदांड मल्लाची उपस्थिती
दोन दोन मिनिटाला चितपट होत असलेल्या कुस्तीने खरोखरच कुस्ती शौकिनाच्या डोळ्याचे
पारणे फिटणार आहे. दिल्ली,पुणे, अहिल्यानगर, करमाळा,कर्जत, जामखेड,बीड,
पाथर्डी,आष्टी, अकलूज यासह अनेक ठिकाणावरून मल्ल येणार आहेत.
-------------------
0 टिप्पण्या