

पती-पत्नीतील नात्यांची गाठ ही स्वर्गात बांधली जाते' असे म्हटले जाते. मनुष्य जीवन सर्वांग सुंदर आहे.मानवी जीवनात १६ संस्कार आहेत.त्यापैकी विवाह हा संस्कार आहे.परिपूर्णतेसाठी या संस्कारातूनच यशस्वी जीवनाची सुरुवात होते. आयुष्यभर एकत्र आणि सोबत राहून या जीवनातील कर्तव्य शीलता, सामाजिक बांधिलकी,आनंद नैतिकता,चारित्र्य तसेच इतरांसाठी जगण्याची ऊर्जा बळ,शक्ती समवेतच संवेदनशीलता ही मूल्य जपून करावी लागते.अशाच एका " उत्तम " जोडप्याचा वास्तव नमुना आष्टीतील पत्रकारिता क्षेत्रातील एका लढवय्या व्यक्तिमत्त्वाच्या अनुषंगाने दृष्टीक्षेपात पडला!
आपल्या वैवाहिक जीवनाला ३० हून अधिक वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यातील गोडवा, मधुरता, जिवलगपणा, लाडीवाळपणा.. प्रेम जिव्हाळा, अस्था, माया कायम; तितकीच किंबहुना अधिक दृढ आणि मजबूत करून मुलांना योग्य संस्कार करत शिक्षण संस्कृती आणि लेखणीच्या माध्यमातून ती पुढे नेण्यात आनंद मानणारी ही जोडी आहे.त्या जोडीचे नाव आहे- वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि त्यांच्या सुविधा पत्नी शिक्षिका बबीताताई उत्तम बोडखे!
सातत्याने हसतमुख राहून कर्तव्यशीलता जपणारी ही जोडी! वयाच्या ५४ वी. नंतरही आणि विवाहाच्या ३० व्या वर्षानंतर तितकीच सुखद,देशाच्या कानाकोपऱ्यात ऐतिहासिक,धार्मिक स्थळांना भेटी देत मनसोक्त भ्रमण करणारी... हसतमुख रसाळ वाणी... आणि सदैव सकारात्मक राहून प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही!
---प्रा.बिभिषण चाटे (बीड)
------------------
0 टिप्पण्या