
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टीचे माजी आ.भीमराव धोंडे यांचे पुतणे व कडा कृ.उ.बा. समितीचे
उपसभापती नामदेव धोंडे यांचे चिरंजीव निरंजन धोंडे यांचा श्रीगोंदा येथे शाही थाटात
विवाह संपन्न झाला. सौ.प्रमीला व श्री नामदेव धोंडे यांचे चिरंजीव व पारगांव
श्रीगोंदा येथील सौ. मिनाक्षीताई व श्री मारुती हिरवे यांची चि.सौ.कां. ऋतुजा हिचा
विवाह श्रीगोंदा येथील नक्षत्र लाॕन्स व मंगल कार्यालयात शाही थाटात संपन्न झाला.या
विवाहास महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज गहिनाथगडकर, ह.भ.प.राधाताई सानप महाराज,
ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू, ह.भ.प.निवृत्ती बोडखे महाराज, ह.भ.प.आदिनाथ महाराज
अंधाळे, आ.विक्रम पाचपुते, माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. राजेंद्र जगताप, माजी
आ.जनार्दन भाई तुपे,माजी आ. साहेबराव दरेकर, अहिल्यानगर जि.प.चे.माजी अध्यक्ष
बाबासाहेब भोस,अशोक हिंगे, सुभाष सारडा, बापुसाहेब डोके, नियामत बेग, ॲड.साहेबराव
म्हस्के,सौ.दमयंतीताई धोंडे, राजेंद्र धोंडे,डाॕ.अजय धोंडे, अभय धोंडे, विठ्ठलराव
बन्सोडे, संतोषशेठ मेहेर, अमोल भंडारी, बाबासाहेब दळवी, शेख अन्सारभाई, सरपंच
भीमराव बोडखे,प्रा.डाॕ.राम बोडखे, भानुदास बोडखे, अण्णासाहेब चौधरी,भाजप
जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,रामराव खेडकर, बाबूशेठ भंडारी,अशोक साळवे,माजी सरपंच
संतोषभैय्या चव्हाण,हरिभाऊ जंजीरे,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते, अशोक खंदारे,
बबनराव औटे,प्रा. डाॕ.शाम सांगळे,नामदेव राऊत,समाजसेवक विजय गोल्हार,सतिषमामा झगडे,
ह.भ.प.राऊतदादा पिंपळा,दिनकरराव तांदळे,सरपंच सावता ससाणे,इंजि. बाळासाहेब
भुकन,दत्ताभाऊ बोडखे,ॲड.हनुमंत थोरवे,दिलीप काळे,ॲड.बाबुराव अनारसे,विक्रम
पोकळे,पोपट घुले, पांडुरंग गावडे, विठ्ठलराव लांडगे, चेअरमन अरुण सायकड,कल्याण
काकडे,ॲड. रत्नदीप निकाळजे, प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय
वाघ, प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ,प्राचार्य साईनाथ मोहळकर, सदाशिव दिंडे, नवनाथ
अनारसे, के.के.काळे,सुभाष रासकर,बाळासाहेब शिंदे,उपसभापती पांडुरंग नागरगोजे,
बाळासाहेब पवार,रामदास बडे,प्रा.डाॕ.विनोद ढोबळे,डाॕ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास
विधाते,ॲड. भाऊसाहेब सायंबर,विष्णु ससाणे,चेअरमन बबन नन्नवरे, इंजि.डी.एस.देशमुख
आदिअहिल्यानगर,बीड,पुणे जिल्ह्यातील व्यापार, उद्योग,राजकीय, सामाजिक,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
---------------
उभयतांच्यावतीने मातृ पितृ व
समाजाची अखंड सेवा घडत राहो अशी प्रार्थना करण्यात आली आहे.सामाजिक राजकीय,धार्मिक,
वैचारिक, सांस्कृतिक,शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रात अत्यंत प्रमाणिकपणे आणि
सामंजस्याने आपली भूमिका आणि कर्तव्य निभावत कार्य करणारे धोंडे कुटुंबीय सर्वांना
सोबत घेऊन आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. माणसे जोडणे हा त्यांचा स्वभाव धर्म
असून विविध जाती धर्म पंथ त्यांना समवेत घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा आणि
वारसा उत्तमरीत्या चालवला आहे.मुलांना उच्च शिक्षण देऊन संस्कार संपन्न बनवण्यात
धोंडे कुटुंबियांची खासियत आहे. उपसभापती नामदेव धोंडे यांचे चिरंजीव निरंजन यांचा
विवाह श्रीगोंदा येथील हिरवे यांची कन्या ऋतुजा हिच्याशी श्रीगोंदा येथे संपन्न
झाला. यावेळी राजकीय, सामाजिक,धार्मिक,वैचारिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,आर्थिक,
व्यापारी,नोकरदार आदिसह विविध क्षेत्रातील नामांकीत मान्यवर आशीर्वाद देण्यासाठी
आवर्जून उपस्थित होते. दरम्यान,या विवाहाचे निमंत्रण महाराष्ट्राच्या कॅबिनेट
मंत्री पंकजाताई मुंडे यांना देण्यात आले होते.ना.पंकजाताई मुंडे यांनी वर पिता
नामदेव धोंडे यांना विशेष शुभेच्छा संदेश आवर्जून पाठवला.त्यात त्यांनी चि. निरंजन
आणि चि.सौ.कां. ऋतुजा यांना आशीर्वाद दिले. उभयतांच्यावतीने मातृ-पितृ व समाजाची
सेवा अखंड घडत राहावी अशी प्रार्थनाही केली आहे.उपस्थित विविध क्षेत्रातील
मान्यवरांचे स्वागत निमंत्रक माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने उपसभापती नामदेव
धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे,ज्ञानदेव धोंडे प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे,पांडुरंग
धोंडे, उपप्राचार्य संजय धोंडे,प्रा. श्रीकांत धोंडे यांनी केले.धोंडे आणि हिरवे
परिवाराच्यावतीने उपस्थितांचे आभार माजी आ.भीमराव धोंडे यांनी मानले. बहारदार
सुत्रसंचलन संचलन प्राचार्य डाॕ.बाळासाहेब खेमगर यांनी केले. ------------------
0 टिप्पण्या