Ticker

6/recent/ticker-posts

नारायण वनवे या तरुणाने जिद्दीने व कष्टातुन हा प्लांट उभारला ......... आ.सुरेश धस यांच्याकडुन कौतुकाची थाप

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वेताळवाडी ( किन्ही) येथे शहादेव वनवे, नारायण वनवे आणि ज्ञानेश्वर तांदळे या तीन तरुण उद्योजकांनी एकत्रित येऊन मोठा धाडशी निर्णय घेत संत वामनभाऊ इन्फ्रा.हॉट मिक्स (डांबर) प्लांट सुरु केला आहे. अतिशय मेहनतीने जिद्दीने हा प्लांट त्यांनीसुरु केला आहे. माझ्या शुभेच्छा तर आहेच आपण या तरुणांना सर्वोतोपरी सहकार्य करणार आहोत. नारायण वनवे या तरुणाने जिद्दीने कष्टातुन हा प्लांट उभारला आहे असे गौरोवोद्गार आ.सुरेश धस यांनी काढत कौतुकाची थाप दिली आहे, आष्टी मतदार संघाचे आ.सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी गहिनिनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज आणि गणेशगड नागतळाचे महंत काशीनाथ महाराज, ह.भ.प.आदिनाथ महाराज आंधळे, चेअरमन आदिनाथ सानप,रोहिदास महाराज गर्जे, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, माजी चेअरमन विष्णुपंत चव्हाण,बीराजदार,सभापती बद्रीनाथ जगताप,माजी जि.प. सदस्य शिवाजी नाकाडे,बाबुराव केदार,शत्रुघ्न मरकड, चेअरमन संजय गाढवे,किशोरनाना हंबर्डे, हरिभाऊ तांदळे,नारायण वनवे, चेअरमन अशोक गर्जे,चेअरमन नामदेव राऊत,अमोलराजे तरटे, अमोल शिंदे, ज्ञानदेव गिते, एन.टी.गर्जे,बबन करांडे,नामदेव काकडे,सुभाष गणगे, विलास वायभासे,उद्धव गर्जे,इंजि. प्रविण वारे,विकास गोल्हार, शेषराव गर्जे,दत्ता चव्हाण, चेअरमन आत्माराम फुंदे आदि मान्यवर उपस्थित होते. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या