आष्टी ( प्रतिनिधी ) कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण कार्यात लक्ष्मीबाई दुधातील
साखरेसारख्या एकरूप झाल्या होत्या; वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांनी मुलांसारखे
जपले. सावित्रीबाई फुलेंनी सुध्दा मुलींच्या शिक्षणाचा तेजोमय प्रवास सुरू केला असे
सांगत सद्यस्थितीतील मुलींची शिक्षण क्षेत्रातील उच्च गुणवत्ता ही महिलांच्या
सकारात्मक परिवर्तन आणि स्थित्यंतराची साक्ष आहे असे मत आरोग्य क्षेत्रातील
सुप्रसिद्ध डॉ.शुभांगी बडे यांनी मत व्यक्त केले. दहावी बोर्ड परीक्षेमध्ये
रेसिडेन्शिअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल
कु.सिद्धी बिभिषण चाटे हिचा सत्कार शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन करण्यात
आला.त्यावेळी डॉ. शुभांगी सोमनाथ बडे बोलत होत्या.यावेळी डॉ.सोमनाथ बडे,सुप्रसिद्ध
विधीज्ञ ॲड. संजय सानप,अध्यात्मक क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक रामदास काका बडे,सौ.
वैशालीताई बडे,प्रा.बिभिषण चाटे,हिंदी साहित्य क्षेत्रातील अभ्यासाक आदर्श शिक्षिका
आशाताई चाटे- फड आदी सह उपस्थित होते.विधिज्ञ संजय सानप यांनी विद्यार्थ्यांनी
बालपणापासून खडतर परिश्रम आणि योग्य दिशेने जात शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार
प्रमाणिकपणे अभ्यास केल्यास योग्य दिशा मिळते असे सांगितले.डॉ.सोमनाथ बडे यांनी
कु.सिद्धी चाटे हिने उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल कौतुक करत अभिनंदन आणि
भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास बडे यांनी ईश्वराचा सदैव
हात कु.सिद्धीच्या पाठीमागे राहील असा आशीर्वाद दिला.
चौकट
---------

शिक्षकांनी
केलेले नियमित अध्यापन, मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांनी परिश्रम
घेण्यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि केलेला नियोजनबद्ध अभ्यास याचा एकत्रित
परिणाम म्हणून हे यश प्राप्त झाले! अशी प्रतिक्रिया गुणवंत विद्यार्थिनी कु.सिद्धी
चाटे हिने सत्कारा नंतर आपल्या मनोगतात व्यक्त केली आणि सर्वांचे आभार मानले.
----------------------------------
0 टिप्पण्या