
(
(आष्टी (प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील मातावळी
वनवेवाडी गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता ही नाही, फोनवर संपर्क करण्यासाठी टॉवर नसल्याने कोणत्याच मोबईलला रेंजदेखील नाही झाडावर घरावर चढून कॉल करावे लागतात.बसदेखील फक्त मतदानापुरती येते
पायाभूत सुविधांचा अभाव असून वारंवार मागणी करूनही
प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी चक्क वानवेवाडीच विक्रीला काढली आहे.ग्रामस्थांनी राज्य सरकारला गाव विकत घेण्याचे आवाहन केले आहे.आष्टी तालुक्यातील वनवेवाडी गाव तस चांगल सुशिक्षित वर्ग तरुण वर्ग ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे.गावामध्ये ज्या पायाभूत सुविधा मिळायला हव्या त्याच मिळत नाहीत केवळ राजकीय स्वार्थ
साधण्यासाठी निवडणुवेळी
वेगवेगळी आश्वासने दिली जातात,पूर्तता काहीच होत नाही. गावाला रस्ता नाही, बस नाही, कोणत्याच मोबाईलला रेंज नाही, मुलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांची
हेळसांड सुरू आहे.ग्रामस्थांनी रस्त्याचे श्राद्ध घालत पुष्पहार चढवत बोंबाबोंब आंदोलन
केले.वनवेवाडी १ हजार लोकसंख्या असलेली वाडी आहे.क्षेत्रफळ ही जास्त असे असतानाही लोकप्रतिनिधींनीचे या विकास कामाकडे दुर्लक्ष होत आहे.रस्त्याची बिकट अवस्था मोबाईलला ही रेंज येत नसल्याने ग्रामस्थांना अनेकदा झाडावर चढावे लागते त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. गाव विक्रीला काढत असून सरकारने गाव विकत घेण्याचे आवाहन केले आहे.
चौकट
--------
आष्टी तालुक्यातील मातावळी अंतर्गत वनवेवाडी गावचा दोन तालुक्यांचा दळणवळण रस्ता असून रस्त्यामुळे बस येत नाही.
पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. बस नाही,मोबाईलला रेंज नाही,सुविधांचा अभाव असून वैतागून वनवेवाडी विक्रीचा निर्णय ग्रामस्थांनी
घेतला आहे. प्रशासनाने सरकारने तातडीने निर्णय घ्यावा नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल
----- विष्णू वनवे
(माजी सरपंच वनवेवाडी)
0 टिप्पण्या