Ticker

6/recent/ticker-posts

पाच वर्षापासुन दहावीचा १०० टक्के निकाल देणारे पं.नेहरु विद्यालय शाळेतुन आदित्य बोडखे सर्वप्रथम ; कड्याच्या श्रीराम विद्यालयातुन दक्ष गोरे प्रथम

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील शेतकरी संस्था आणि भगिनी संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांचा शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च २०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ,विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी दि.१३ मे २०२५ रोजी निकाल जाहीर झाला आहे.शेतकरी शिक्षण संस्था आणि भगिनी संस्थेने निकालाची उज्ज्वल परंपरा राखली आहे.संस्थेच्या ३९ शाळेपैकी १९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे... ----------------- पंडित नेहरू विद्यालय आष्टी, पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा, मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव,श्रृंगेरी विद्यालय ब्रम्हगाव,श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी,जोगेश्वरी विद्यालय पारगाव (जो.) निजाम पटेल विद्यालय मेहकरी, कानडी अश्वलिंग विद्यालय पिंपळवंडी, राजीव गांधी विद्यालय मातावळी, क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय चुंबळी,संत बाळूदेव महाराज विद्यालय पाटोदा,ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगांवघाट,अहिल्यादेवी विद्यालय टाकळी आमिया, महेश विद्यालय रुईनालकोल, पाटोदा उर्दू हायस्कुल पाटोदा, भैरवनाथ विद्यालय आंमळनेर, ज्योतिर्लिंग विद्यालय कानडी बु.,माऊली विद्यालय बोरोडी,आष्टी पब्लिक स्कुल आष्टी या १९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. श्रीराम विद्यालय कडा आणि जयभवानी विद्यालय कड कारखाना (जळगांव) या शाळांचे ९८ टक्के,वृध्देश्वर विद्यालय गहुखेल व कानिफनाथ विद्यालय चोभनिमगांव या शाळांचे ९७ टक्के निकाल लागला. हरिनारायणस्वामी विद्यालय क-हेवाडी,संत वामनभाऊ विद्यालय पाटसरा,पांडुरंग विद्यालय निमगाव बोडखा, हनुमान विद्यालय घाटा पिंप्री, सय्यदमीर बाबा विद्यालय लोणी,आंबिका विद्यालय बेलगाव,छत्रपती शिवाजी विद्यालय आष्टी या सात शाळांचे ९६ टक्के निकाल लागले आहेत.रोडेश्वर विद्यालय डोंगरगण, नागनाथ विद्यालय नागतळा,यशवंतराव चव्हाण विद्यालय पोखरी,विट्ठल विद्यालय नांदुर या शाळांचे ९५ टक्के निकाल लागला आहे.इंदिरा कन्या विद्यालय धामणगाव,यशवंतराव होळकर विद्यालय शिरूर,प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव,सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण, भगतसिंग विद्यालय किन्ही या शाळांचे ८० ते ९५ टक्के निकाल लागला आहे.शेतकरी शिक्षण संस्था आणि भगिनी संस्थेच्या ३९ शाळांमधुन १ हजार ५७७ विद्यार्थी दहावी परिक्षेला बसले होते त्यापैकी १ हजार ५४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी सांगितले. पं.नेहरु विद्यालय आष्टी ------------------ शेतकरी शिक्षण संस्था संचलित आष्टी शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयाचा एस.एस.सी.परिक्षा मार्च २०२५ चा शेकडा निकाल शंभर टक्के लागला आहे.या शाळेतुन १८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते सर्वची सर्व उत्तीर्ण झाले आहेत.पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाने १० वी बोर्ड परीक्षेत राखली यशाची परंपरा कायम,१२ वि‌द्यार्थ्यांनी घेतली उत्तुंग गरुडझेप घेतली आहे.१० वी. बोर्ड परीक्षेत आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाने १० वी. बोर्ड परीक्षेत याही वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी. बोर्ड परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे.पंडीत नेहरू माध्यमिक विद्यालयाचे १८८ वि‌द्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ९० ते १०० टक्के गुण संपादन करणारे 59 विद्यार्थी,८० ते ९० टक्के गुण संपादन करणारे ५६ विद्यार्थी,७० ते ८० टक्के गुण संपादन करणारे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांनी सांगीतले.बोडखे आदित्य सुरेश १०० टक्के,हुमे आदित्य रविंद १०० टक्के,कु. कुत्तरवाडे वैष्णवी बापूराव १०० टक्के (समान गुण सर्वप्रथम) कु. बन्सोडे समृध्दी चंद्रकांत ९९.४० टक्के (व्दितीय) कु.पवार गौरी प्रविण ९९ टक्के (तृतीय), कु.धोंडे तनिष्का प्रदिप ९८.८० टक्के, चि.फुंदे सोहम अशोक ९८.६० टक्के,गिरी ओमकार सुभाष ९८.६० टक्के, कु.टकले वृषाली लक्ष्मण ९८.६० टक्के, कु.झगडे भक्ती मोहन ९८.४० टक्के ,शिरसाट विश्वप्रताप अशोक ९८.२० टक्के, कु.राऊत प्राजक्ता ज्ञानेश्वर ९८ टक्के, सिध्दि चंद्रकांत बान्सोडे ९६.६० टक्के गुण संपादन करून यशाची गरूड झेप घेतली आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे, डॉ.अजय धोंडे, अभय धोंडे,जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी. राऊत,प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे,दत्तात्रय गिलचे,संजय शेंडे,पंडीत शाळेचे प्राचार्य सुरेश बोडखे वा सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन केले. -------------- श्रीराम विद्यालय कडा ------------------ कडा येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी मार्च २०२५ परीक्षेचा एकूण वार्षिक निकाल ९९ टक्के निकाल लागला आहे.श्रीराम विद्यालयातुन दक्ष विठ्ठल गोरे सर्वप्रथम आला आहे.श्रीराम विद्यालयातुन दक्ष विठ्ठल गोरे (सर्वप्रथम ९६.८० टक्के), शेख सुहाना युनुस (व्दितीय ९४.८० टक्के),रोहन गुरुदेव नवले ९४.८० टक्के) विशेष प्राविण्य ६१ तर प्रथम श्रेणी १६ तर व्दितीय श्रेणी १० असा निकाल लागला आहे. शाळेचा निकाल ९९ टक्के लागला आहे. ----------------
हरिनारायण स्वामी विद्यालय ------------------- आष्टी तालुक्यातील किसान शिक्षण संस्था संचलित क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाचा एस.एस.सी.परिक्षा मार्च २०२५ चा शेकडा निकाल ९६ टक्के लागला आहे. सांगळे आकांक्षा रामदास ९३.६० टक्के (प्रथम), सांगळे शुभांगी शिवाजी -९२. ८० टक्के (द्वितीय), सांगळे कोमल बाबासाहेब -९०.२० टक्के (तृतीय) सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या