Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या यात्रा उत्सवास आजपासुन प्रारंभ

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथील मौलाली बाबांचा उरूस (यात्रा) उत्सवास आजपासुन प्रारंभ होत आहे.मुख्य यात्रा आज सोमवारी बुद्ध पौर्णिमेला साजरी होत आहे.हा उत्सव आठ दिवस सुरु राहणार आहे.आष्टी तालुक्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते.पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत भाविक न्हाऊन निघणार आहेत. बुधवारी संदल मिरवणूक काढण्यात आली होती तर गुरुवारी मौलाली बाबा समाधीला गलफ व शेरा चढविला आहे.आज सोमवारी १२ मे रोजी सायंकाळी छबिना मिरवणूक होणार आहे.कडा येथील कडी नदीच्या तीरावर सर्व धर्म पंथीयांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून मौलाली बाबांचा दर्गा प्रसिद्ध आहे.या दर्ग्याच्या महती ऐतिहासिक काळापासून कडेकरांनी जपली आहे. याठिकाणी वर्षातून एकदा म्हणजे बुद्ध पौर्णिमेला हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात याला शोकडो वर्षाचा इतिहास साक्षीदार आहे. हा उत्सव आज सोमवारपासून सुरू होत आहे.यासाठी हजारो भाविक कड्यात दाखल झाले आहेत.कडी नदीच्या तीरावर मनमोहक असा अतिसुंदर बाबांचा दर्गा आहे. यात्रेनिमित्त भव्यदिव अशी रंगेबेरंगी रोषणाई करण्यात आली आहे.यात्रेसाठी कडा गावचे रहिवासी पण कामधंदा किंवा नोकरीसाठी बाहेरगावी स्थाईक झालेले सर्व कडेकर घरातील एखादे कार्याला येणे टाळतात परंतु यात्रेसाठी हमखास येतात हे विशेष म्हणावे लागेल. यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळपासून ढोलताशांच्या गजरात विविध रंगाच्या फुलांनी सजवलेल्या चादरीची मिरवणूक काढत बाबांच्या चरणी अर्पण करतात.या चादरींची मिरवणूक एक मोठे आकर्षक असते.विविध तरुण मंडळे यात मोठ्या संख्येने सहभागी होतात.सायंकाळी छबिना (संदल) मिरवणुकीस प्रारंभ बँड,ढोली बाजाच्या गजरात होतो.यात आष्टी तालुक्यातील नामकित बँडचा समावेश असतो. छबिण्याच्या वेळी बाबांचा घोडा यामध्ये सामील असतो या घोड्याची संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते. त्यावेळी गावातून जाताना घरोघरी घोड्याची पूजा करून आशिर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मोठी गर्दी होते यावेळी साक्षात बाबांचे दर्शन घेतल्याचा मनस्वी आनंद प्रत्येकाला होतो मिरवणुकीनंतर घोडा बाबांच्या दर्ग्यात आणला जातो त्यावेळी रंगेबेरंगी शोभेची दारू उडवून फटाके फोडून आतिषबाजी केली जाते ही आतिषबाजी पाहण्यासाठी दूरदूर वरून लोक येतात.यात्रेत मनोरंजन करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आले आहेत.त्यात शंभर फुटी रहाट पाळणा,मौत का कुआ, सर्कस,पन्नालाल,भौरवी जादूगार असे एक से बढकर एक कार्यक्रम मनोरंजन करतात शिवाय विविध प्रकारचे खेळणी दुकाने,मिठाई स्टॉल दाखल झाले आहेत. उद्या मंगळवारी कुस्त्यांचा जंगी मुकाबला येथे होणार आहे.यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह राजकीय, सामाजिक,कुस्ति क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. हा यात्रा उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य, यात्रा कमिटी परिश्रम घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या