


उटी ( प्रतिनिधी)
उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत पत्रकार,प्राध्यापक,
इंजिनियर,शिक्षक,शिक्षीका,हाॕटेल व्यवसायीक यांच्यासह नातेवाईक फॅमिलीने महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेर कर्नाटक, तामिळनाडु मधील (उटी,मैसुर, कोडाईकनल, कनाॕल,कोयंबतूर), तामीळनाडुमधील विविध स्थळांना भेटी देत अनोखा अनुभव अनुभवला. दरम्यान,हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार तथा ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या हॉटेलला भेट देण्याचा विशेष योग आल्याने पत्रकार उत्तम बोडखे,सौ.
बबिताताई बोडखे, प्रा.मोहन धोंडे सर,
सौ.आशा रासकर मॅडम,गणेश धोंडे सर,अर्जुन रासकर सर,सौ.प्रभा रासकर मॅडम, भाऊसाहेब रासकर सर,कु.श्वेता अर्जुन रासकर यांच्यासह फॅमिली प्रचंड उत्सुकतेने पाहण्यात मग्न झाली.आष्टी व जामखेड येथील नातेवाईक फॕमिलीने भेट दिलेली स्थळ
मैसूर पॅलेस,मैसूर झू,चामुंडा हिल, चामुंडा देवी दर्शन, वृंदावन गार्डन
उटी,मधुमलाई फॉरेस्ट,पायकरा वॉटर फॉल,पाईन फॉरेस्ट,रोज गार्डन, मिथुन चक्रवर्ती यांचे द मोनार्च हॉटेल,
कोडाईकनल - उदगमंडलम ते कन्नूर टॉय ट्रेन,कोडई कन्नड लेक, कोयंबतूर - आदियोगी मंदीर
अशा कर्नाटक व तामिळनाडु या राज्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा जतन असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना भेटी दिल्या.दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि फॅमिली गेल्या दोन दिवसापासून देशातील विविध ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेट देत आहे त्यांनी नुकतीच बेंगलोर, म्हैसूर,उटी, कोयंबतूर येथील संस्मरणीय ठेवा असलेल्या स्थानांना भेटी दिल्या. मैसुर येथील ऐतिहासिक मैसुर पॕलेस पाहिले.तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार तथा जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या " द मोनार्च हाॕटेल उटी " या र्हॉटेलला भेट देण्याचा योग आला. हॉटेलची उभारणी, ग्राहकासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि सोयी विशेष अनुभवायला आल्या.दरम्यान, या भेटीमधून देशाची वैविध्यपूर्ण स्थिती, विविधतेतून एकता,विविध जाती धर्मातून एकसंघ राहण्याची भावना या राष्ट्रीय एकात्मता या बाबी शिकण्यास मिळतात अशी प्रतिक्रिया प्रा.मोहन धोंडे यांनी दिली.
0 टिप्पण्या