Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.बिभिषण चाटे सर म्हणजे साधासरळ,मनमिळाऊ मित्र

माणसे' जोडणारा 'गोड माणूस'! --------------------- माणसे जोडणे हा प्रा.चाटे सरांचा हुकमी गुण आहे.एकदा जवळ आलेला माणूस तो कायम जोडला जातो.ही त्यांची खासियत आहे म्हणूनच बीड जिल्ह्यासह विविध क्षेत्रात लेखन करणारे सन्माननीय पत्रकार,लेखक आणि मार्गदर्शक असलेले संपादक यांच्याशी त्यांचा स्नेह अत्यंत मधुर आहे.२५ वर्ष प्रा.बिभिषण चाटे सरांच्या लेखन शब्द शैलीत साहेबांच्या जीवन कार्यावर आधारित लेख लिहिले आहेत.या त्यांच्या लेखणीचा विशेष उल्लेख करत रामकृष्ण बांगर साहेबांनी चाटे सरांचे कौतुक करत विशेष सन्मान केलेला आहे. यावेळी प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्य सौ.सत्यभामाताई बांगर उपस्थित होत्या. जीवनात त्याग,कष्ट,संयम, सज्जनपणा व नम्रता अंगी बाळगून अत्यंत रसाळ,गोड मधुर वाणीतून हजारो विविध क्षेत्रातील मित्रांच्या माध्यमातून एकोपा,चांगुलपणा,सहकार्य वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या प्रांजळ भावनेतून सकारात्मक भाव ठेवून दिलखुलास जीवनप्रवास करणारे..पत्रकारिता,शिक्षण, संस्कृती,निवेदन आणि अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्रा.बिभिषण चाटे सरांच्या विविध सामाजिक कर्तव्य भावनेचा आम्हाला अभिमान वाटतोय! प्रा. बिभिषण सर यांनी आपल्या पेशासी अत्यंत प्रमाणिक राहून कर्तव्य निभावले.प्रत्येक माणूस समाजाचे देणं लागतो,या भावनेतून जाणीव आणि संवेदना ठेवून कार्य केले. विविध क्षेत्रातील गुणी जणांच्या किंबहुना राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्यावर आपल्या लेखणीतून अत्यंत गोड मधून वाणीच्या लेखनातून केलेला स्पर्श नक्कीच आयुष्यभर स्मरणात राहील हा विश्वास आहे.प्रा.चाटे सरांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांमध्ये गेल्या तब्बल ३० वर्षांमध्ये हजारो लेख,आर्टिकल्स,शोध बातम्या यांच्या माध्यमातून फार मोठे लेखन कर्तव्य निभावले आहे. अनेकांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पर लेख हे ठरलेले असतात.इतरांच्या सुख आणि आनंदात त्यांचा आनंद असतो! अशा विविध लेखन कार्याची दखल घेत त्यांना राज्यभरातून जिल्हा,विभाग,राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे. माणसे कशी जोडावीत, हे चाटे सरांची खासियत कौतुकास्पद आहे.मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ही त्यांनी लीलया पेललेली आहे; याबद्दल मकरंदजींनी सरांचे कौतुक केलेले आहे.प्रा.चाटे सर यांच्या अभिष्टचिंतन दिनाच्यानिमित्ताने त्यांना निरोगी दीर्घायुष्य समृद्धी लाभावी.दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.... ------------------------------- चौकट ---------- प्रा.चाटे यांना प्रदान झालेले विशेष पुरस्कार- सन्मान ----------------------------- राजे मल्हारराव होळकर राज्य पुरस्कार,साने गुरुजी आदर्श पुरस्कार, द स्कूल एक्सप्रेस बीडचा गुणवंत शिक्षक पुरस्कार,राज्यस्तरीय कमलरत्न पुरस्कार,संत भगवान बाबा संत वामनभाऊ जीवन गौरव पुरस्कार,कै.ईश्वरचंद्र गुप्ता स्मृती पुरस्कार,मातृभूमी प्रतिष्ठान बीडचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार,गंगाई- बाबाजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, स्व.मोहनलाल बियाणी विभागीय आदर्श पत्रकार पुरस्कार,मराठी पत्रकार परिषदेचा सहकार महर्षी स्व.दत्ताआबा शिंदे आपेगावकर स्मृती पुरस्कार या व आशा अनेक पुरस्कारांनी प्रा.चाटे सरांच्या उत्कृष्ट लेखणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ---------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या