उत्तम बोडखे, आष्टी
-----------------
------------
महावीर जयंतीनिमित्त आष्टीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.आज बुधवार दि.९ एप्रिल रोजी ह.भ.प.डाॕ. जलाल महाराज यांचे प्रेरणदायी व सुश्राव्य व्याख्यान होणार आहे.उद्या प्रसिद्ध कवी व्याख्याते डाॕ.संजय कळमकर यांचे व्याख्यान होणार आहे.

---------
चौकट
--------
मी मुस्लिम आहे की हिंदू,हा प्रश्न गौण आहे.रामायणातील विचार आणि संतांच्या शिकवणीचा प्रचार करून समाजात समतेचा विचार रुजविण्याचा माझा प्रयत्न आहे.धर्माच्या नावावर माणसं एकमेकांपासून दुरावली,तर अध्यात्माचा उद्देशच संपतो. म्हणूनच व्याख्यान,रामकथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून मी प्रेमाचा,सेवाभावाचा आणि समतेचा संदेश देतोय.
----- डॉ.जलाल महाराज.
(करंजी खुर्द,ता.निफाड)
-----------------
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी जैन समाजाच्या वतीने आष्टी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये बुधवारी ह.भ.प. डॉ.जलाल महाराज सय्यद यांचे तर गुरुवारी डॉ.संजय कळमकर यांच्या व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरांमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.आज बुधवार दि.९ एप्रिल रोजी " अरे माणसा माणसा " या विषयावर ह.भ.प.डॉ. जलाल महाराज सय्यद यांचे तर गुरुवार दि.१० एप्रिल रोजी
" जगण्यातील आनंदाच्या वाटा " या विषयावर डॉ.संजय कळमकर यांच्या व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम आष्टी शहरातील आनंद ऋषीजी चौक येथे रात्री आठ ते दहा या वेळेत संपन्न होणार आहेत. शुक्रवारी सकाळी भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीदिनी
पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.समाजाला जात-पात,धर्मभेदाच्या
पलीकडे नेले.ह.भ.प. महामंडलेश्वर डॉ.जलाल महाराज सय्यद हे याच परंपरेतील एक अनोखे कीर्तनकार.मुस्लिम कुटुंबात
जन्म झालेल्या डाॕ.जलाल महाराजांनी वारकरी संप्रदायाचा अंगीकार केला.
आणि वारकरी संप्रदायाच गजर करत ते समाज प्रबोधन करतात.श्रीराम कथा,वारकरी संप्रदायाचे अभंग,अध्यात्मिक व्याख्यान आणि संतवाडःमय यांचा अभ्यास करून त्यांनी अध्यात्माचा नवा दुवा तयार केला आहे.नाशीक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील करंजी खुर्द गावचे रहिवासी असलेले ह.भ.प.डाॕ. (जलाल महाराज यांचे घराणे तीन पिढ्यांपासून वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे. त्यांचे आजोबा आणि वडीलही एकतारीवर भजन करायचे.त्यामुळे लहानपणा पासूनच त्यांना संतवाडःयाची गोडी लागली.त्यांचा रामायणावरील अभ्यास एवढा सखोल आहे की,त्यांनी या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट (विद्या वाचस्पती) ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त केली आहे. मनातील रामायणाच्या कथनाची त्यांची शैली वेगळी असून, मराठीतून आणि हिंदीतून ते देशभर श्रीराम कथा सागतात.राम आणि अल्लाह वेगळे नाहीत.मी वारकरी संप्रदायात आहे,कारण तो सर्वधर्म समभाव मानणारा आहे.रामकथेतून समाजप्रबोधन करणे हेच माझे ध्येय आहे असेही ते सांगतात.वारकरी संप्रदायाची शिकवण स्पष्ट आहे.मानवतेलाच सर्वोच्च धर्म मानावा.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यांच्या विचारांवरच ह.भ.प.डाॕ. जलाल महाराज सय्यद यांचे जीवन आधारित आहे.मी कीर्तनकार आहे,पण त्यापेक्षा आधी मी माणूस आहे.माणुसकी पाळली तरच खरा धर्म,असेही ते ठामपणे सांगतात.एक मुस्लिम कीर्तनकार म्हणून सुरुवातीला समाजाने त्यांना सहज स्वीकारले नाही.काही कट्टर प्रवृत्तींनी विरोध केला,टीका केली. मात्र,वारकरी संप्रदायाने त्यांना उचलून धरले.मी कीर्तनात रामनाम घेतो, संत तुकारामाचे मनातून अभंग गातो,त्यावेळी श्रोत्यांनी मला कधीही वेगळे मानले नाही.माझे कीर्तन ऐकताना लोक जाती-धर्माचा विचार करत नाहीत.ते फक्त त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचा स्वीकार करतात, असेही रामायणाचार्य ह.भ.प. डाॕ.सय्यद महाराज सांगतात.
केवळ कीर्तनापुरतेच मर्यादित न राहता ह.भ.प.डाॕ.जलाल महाराज सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत.ते आदिवासी भागातील मुलांसाठी शाळा आणि वसतिगृह सुरू करण्याच्या तयारीत आहेत. दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याची त्यांची इच्छा आहे. रामकथेच्या माध्यमात जर माणसांच्या मनात प्रेम आणि सेवावृत्ती निर्माण होणार असेल,तर तोच खरा परमार्थ आहे, असेही ते सांगतात.
-------------------
0 टिप्पण्या