वाढदिवस विशेष
------------
बोडखे दत्ताभाऊ बोडखे

-----------------
चौकट
-------------
राजकीय, सामाजिक,
शैक्षणिक,धार्मिक,
कृषी आदीसह विविध क्षेत्रात आपले मोठे योगदान देऊन धोंडे परिवाराने आपली जबाबदारी पूर्ण केली.माजी आ. भीमराव धोंडे यांचा सक्षम वारसा त्यांचे सुपुत्र अजयदादा धोंडे निभावत आहेत.शिक्षणमहर्षि,संयमी नेतृत्व, विकासाभिमुख नेते माजी आ.भीमराव धोंडेसाहेब यांचे जेष्ठ चिरंजीव डाॕ. अजयदादा धोंडे यांचा आज वाढदिवस....
-------------
आईचं वर्णन अनेक साहित्यिकांनी, वक्त्यांनी आपल्या शब्दामधून रेखाटलेलं आहे. बापाविषयी खूप कमी लिहिलं किंवा बोललं जातं. तुकोबारायांनी बाप लेकरासाठी काय करतो ? याचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे.बाप आपल्या लेकराच्या ओढीने, प्रेमाखातर,लेकराच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपत्ती जोडतो.रात्रंदिवस काम करून लेकरासाठी,त्याच्या भल्यासाठी धन जोडत असतो. राबराबराबून,कष्ट करून तो संपत्ती जमवत राहतो. आपल्या लेकराच भलं व्हावं,त्याला बनवण्यासाठी स्वतः जीव गहाण ठेवण्याची तयारी बापाची असते. बापाची लेकरावर जिवापाड माया असते.लेकराला तो आपल्या कडेवर घेतो खांद्यावर घेतो.आपल्या अंगावर खेळवतो. आपल्या लेकराच्या प्रेमापोटी बाप घोडा बनतो.त्याच्यासाठी बोबडे बोलतो. आपल्या अंगा खांद्यावर वाढवलेल्या लेकराला स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीचा,स्वतः उपाशी राहून मिळवलेल्या धनाचा मालक बनवून
टाकतो.आपल्या घामातून मिळवलेल्या वैभवाचा आयता धनी करतो.स्वतःच मन मारून जगलेला " बाप " लेकराला सारे देताना उदार असतो.प्रसंगी तो स्वतःच्या भविष्याचाही विचार करत नाही.आपल्या लेकराला सोन्या, चांदीचे अलंकार तो करतो.लेकराच्या अंगावर अलंकार घातले आणि अस अलंकारयुक्त लेकरू आपल्या भरल्या डोळ्यांनी पाहिलं की बापाच्या डोळ्याचे पारणे फिटतात. त्याला अत्यंतिक समाधान मिळतं. आपल्या लेकरासाठी जेवढं साठवून ठेवता येईल तेवढं साठवण्याचा बाप निश्चित प्रयत्न करतो. तुकोबाराय म्हणतात," प्रसंग पडला तर बाप आपल्या जिवावर उदार होतो,कशाची तमा बाळगत नाही, कुठल्याही संकटातून तो आपल्या लेकराला वाचवण्यासाठी तत्पर असतो.
इतर कोणी आपल्या लेकराला त्रास देत असेल तर त्यांना तो त्रास करु देत नाही. आपल्या लेकराच्या वाटेला कोणी जाऊ नये याची बाप म्हणून तो काळजी घेत असतो.आजच्या जागतिकीकरणाच्या काळातही बाप आणि त्याची भूमिका बदललेली नाही.आई-वडिलांना आपल्या लेकराच्या भवितव्याची काळजी असणे चुकीचे नाही परंतु आपल्या लेकराच्या क्षमता न बघता, आपले लेकरू जसं आहे तसं मान्य न करता आपल्या इच्छा लादणे, त्यासाठी लेकरावर जबरदस्ती करणे, दबाव आणणे आई वडिलांनी बंद केलं पाहिजे.आज सगळेच मायबाप आपल्या लेकरांना एमबीबीएस डॉक्टर;इंजिनिअर,
उच्च पदस्थ अधिकारी, उद्योगपती बनवू इच्छितात.क्लासेसच्या गर्दीत सारे लेकर हरपून आणि करपून गेलेत.लेकरांची काळजी ठीक आहे पण जबरदस्ती, इच्छा लादणे हा शुद्ध अन्याय आहे. लेकरांनीही आपले आई बाप आपल्यासाठी किती खास्ता घेतात याचे भान ठेवले पाहिजे. आज आपण ज्या पायावर उभे आहोत त्या पायात बळ येण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी आपलं सारं रक्त आटवलेलं असतं,तुम्ही आज यशाच्या शिखरावर असाल तर तुमचे मायबाप त्या यशाच्या शिखराचा मजबूत पाया आहेत हे कधीच विसरू नका.अगदी लहान वयात आपल्या आई-वडील,आजी-आजोबांचे शांत, शिस्त आणि जबाबदारीचं कर्तृत्व आणि नेतृत्व असलेले संस्कार... आपल्या जीवनभर घेत माणसातील माणुसकीचा मंत्र जपत परिसरातील गोरगरीब, दीनदलित,दुबळ्या,अपंग,ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांच्या मुलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवताना..सदैव आपले पिता आष्टी,पाटोदा
,शिरूर मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या समता स्वातंत्र्य,बंधुत्व आणि प्रगतीच्या संस्कारक्षम तालमीत वाढलेले युवा नेतृत्व आणि आष्टी,पाटोदा
,शिरूर तालुक्यातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक डाॕ. अजयदादा धोंडे त्यांचे व्यक्तिमत्व युवकांना आकर्षित करीत आहे. डाॕ. अजयदादा भीमराव धोंडे ! आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे गेल्या चार टर्म यशस्वी नेतृत्व करणारे लोकनेते,शिक्षण महर्षि माजी आमदार भीमराव धोंडे यांचे सुपुत्र.. अजयदादा धोंडे उच्चशिक्षीत आहेत. खेळ हा त्यांचा जीव की प्राण...पुण्यात सरावासाठी काही वर्षे राहिले.तेथे राहुन असंख्य मित्र जोडले.पीएच.डी.
पदवी घेऊन समाजकारण,
राजकारणात उडी घेतली.वडिलांचा संयमचा वारसा घेत युवकात संघटन सुरु केले आहे. आष्टी,पाटोदा,शिरुर विधानसभा मतदार संघात फिरुन सक्रीय राजकारण, समाजकारण सुरु केलेले आहे.सभा,
बैठका,मेळावे यामध्ये सहभाग घेत छोटे छोटे भाषणे करीत स्टेज करेज, व्यक्तीमत्व विकास केला आहे. डाॕ.अजयदादा यांनी नेतृत्वाचे गुण अवगत केले आहेत. विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना धोंडे यांची गोरगरिबांना विषयीची असलेली तळमळ लक्षात घेऊन त्यांनी संघटन कौशल्य निर्माण केले.गोरगरीब युवकांना सदैव मदत करणे,त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यासह शांत,संयमी, अभ्यासू आणि अत्यंत अष्टपैलू अशा प्रकारचा व्यक्तिमत्व असलेले डाॕ. अजयदादा धोंडे युवकांचे गळ्यातील ताईत बनले आहेत.
राजकारणात काम करताना बीड जिल्ह्याच्या माजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे,भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या लोकनेत्या ना. पंकजाताई मुंडे आदीसह राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्व आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली धोंडे परिवाराच्या माध्यमातून आष्टी, पाटोदा,शिरूर तालुक्यातील शेकडो गाव,वाड्या येथे विकासाची गंगा आणण्यात डाॕ, अजयदादा धोंडे यांची भूमिका आणि वाटा नक्कीच खारीचा आहे.
आष्टी तालुक्यातील खेड्यापाड्यातील युवकांना योग्य दिशा देण्याचे काम डाॕ. अजयदादा धोंडे करत आहेत.धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले धोंडे परिवार भजन, प्रवचन,कीर्तन आदीसह धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. महाराष्ट्रातील लाखो भक्तजनांचे दैवत असलेल्या संत वामनभाऊगडाचे भक्त असलेल्या या परिवाराने वामनभाऊंनी सांगितलेला समतेचा मंत्र नेहमीच प्रमाणिकपणे पाळला.धोंडे परिवारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्म पंथ यांना सोबत घेऊन समता,बंधुत्व आणि राष्ट्रीय ऐक्य जोपासण्याचे कार्य ते करतात.डाॕ. अजयदादा धोंडे हे सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना सातत्याने योग्य दिशा देण्याचे आणि उच्च शिक्षण घेऊन सुसंस्कृत होण्याचे सल्ले देतात. धोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अजयदादा सातत्याने करत आहे.काही वर्षात मतदार संघातील केलेले डांबरीकरणाचे रस्ते कोट्यावधी रुपयाची केलेली कामे आजही सकारात्मक कौतुकास्पद विषय आहे.त्याचा अभिमान मतदार संघातील सर्व वर्गातील आणि सर्व जाती धर्म पंथातील युवक शेतकरी कामगार बांधवांना नक्कीच आहे.तमाम युवकांच्या गळ्यातील 'ताईत' बनलेल्या डाॕ. अजयदादा धोंडे या युवा नेतृत्वाचा आज दि.९ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. एक नवीन उदयन्मुख युवा नेतृत्वाचा आशादायी चेहरा असलेले डाॕ. अजयदादा धोंडे यांच्या भविष्यातील यशस्वी होवो. डाॕ. अजयदादा धोंडे यांना वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने शुभेच्छा...
----------------
0 टिप्पण्या