
आष्टी (प्रतिनिधी)
राज्यात ॲग्री स्टॅक योजने अंतर्गत शेतकरी माहिती संच तयार करुन
शेतकऱ्यांना त्याचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहिम स्वरुपात राबविण्यात येत
आहे.महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन विभाग,शासन निर्णय दि.११ एप्रिल अन्वये
यापुढे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र
क्रमांक (Farmer ID) दि. २५ एप्रिल पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे,ज्या
शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) साठी नोंदणी केलेली
नाही.त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे.
यासाठी शेतकऱ्यांनी ग्राम कृषी विकास समिती व जवळचे आपले सरकार सेवा केंद्राची मदत
घेवून नोंदणी करुन घ्यावी अन्यथा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही,त्यांना शेती
योजनेचा लाभ बंद होणार आहे अशी माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली. आष्टी
तहसिल कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात तहसिलदार वैशाली पाटील
म्हणाल्या की, नुकतीच जिल्हाधिकारी यांनी ऑनलाईन व्ही.सी. व्दारे ॲग्री स्टॅक विषयी
आढावा बैठक घेतली असता आष्टी तालुक्यातील एकूण ६९ हजार ८२७ शेतकऱ्यांपैकी ॲग्री
स्टॅक अंतर्गत फार्मर आयडी शेतकरीओळखपत्र) नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४७
हजार ६५२ इतकी असून अद्यापही २२ हजार १७५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी
शेतकरीओळखपत्रनोंदणी केली नसल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील उर्वरित २२ हजार १७५
शेतकरी यांनी दि. १ मे पर्यंत जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र सेतु केंद्रावर जावून
फार्मर आय डी (शेतकरी ओळखपत्र) नोंदणी करुन घ्यावी.फार्मर आ य डी (शेतकरी ओळखपत्र)
म्हणजे शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतक-याने पेरलेल्या पिकाचे नाव
आणि क्षेत्र निश्चिती करुन माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी
योजनांची कार्यक्षमतापूर्ण अंमलबजावणी करणे होय. यापुढे भविष्यातील सर्व शेतकरी
विषयक योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
0 टिप्पण्या