
आष्टी (प्रतिनिधी )
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे आष्टी येथील पंडित जवाहरलाल
नेहरू विद्यालयाने सालबादप्रमाणे शिष्यवृत्ती परिक्षेत पुन्हा उतुंग भरारी घेतली
आहे. महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत घेतल्या जाणार्या् शिष्यवृत्ती
परिक्षेमध्ये विद्यालयाचे इ.८ वी. व इ.५ वी. चे अनुकमे ४० व ७ विद्यार्थी पात्र
झालेले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री.
भीमराव धोंडे, संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठल बनसोडे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिनेट
सदस्य युवा नेते डाॕ.अजयदादा धोंडे,संस्थेचे प्रसासकीय अधिकारी डाॕ.डी.बी.
राऊत,प्रा. शिवदास विधाते, माऊली बोडखे आदीनी अभिनंदन केले. या सर्व यशस्वी
विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बोडखे सर यांचे
मिळाले होते. विद्यालयातील शिक्षक आर.आर.ससाणे, निकाळजे आर.एस.निकाळजे , श्रीमती
एस.आर.ताम्हाणे, श्रीमती एस.बी.ससाणे यांचे मार्गदर्शन लाभले. इ. ५ वी. चे
शिष्यवृत्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले असे मोठे सर, गाडेकर मॅडम, झगडे मॅडम,
राऊत मॅडम यांनी अध्यापन पूर्ण करून सराव घेऊन हे यश संपादन झाले. गुणवंतांचे
विद्यालयातील प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांलने अभिनंदन केले.
0 टिप्पण्या