Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापक म्हणून बीड जिल्ह्यात सर्वाधिक सेवाकाल लाभलेले ; शेकडो गुणवंत विद्यार्थी घडविणारे प्राचार्य महादेव दानवे

"आईने बनवले, बाबानी घडवले, आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजावला, आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली, आईने लढण्यासाठी शक्ती दिली, बाबानी जिंकण्यासाठी नीती दिली" वरील काव्य पंक्ती प्राचार्य महादेव दानवे यांंच्याबाबत तंतोतंत ख-या ठरतात.शेतकरीपुत्र प्राचार्य महादेव दानवे अभ्यासाच्या जोरावर उच्च पदस्थ झाले आहेत.बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नाव अधोरेखित करीत स्वतःच्या कुटुंबासह समाज व्यवस्थेतील अनेकांच्या माध्यमातून उच्च शिक्षण आणि त्याचे महत्त्व सांगून नवा अध्याय रचणारे प्राचार्य महादेव दानवे यांचा नामोल्लेख अभिमानाने करण्यासारखा आहे.प्राचार्य पदावर अत्यंत प्रमाणिकपणे आणि सक्षमपणे काम केल्यानंतर महादेव दानवे सर आज सेवानिवृत्त होत आहेत.आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील एका शेतकरी कुंटुंबात दि.१९ मे १९६७ जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यशोशिखर गाठले आहे.पहिली ते सातवी जि.प. प्रा.शा.देऊळगांव घाट येथे तर ८ वी.ते १० वी.पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात,११ वी. १२ वी.तिसगाव येथील वृध्देश्वर विद्यालयात आणि अ.नगर येथील न्यू आर्टर्स अॕन्ड सायन्स काॕलेजमध्ये बी.ए. तर याच महाविद्यालयात एम.ए. १९८९ साली पुर्ण केले.१९९० साली संगमनेर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक महाविद्यालयात बी.एड.१९९० साली केले.पुणे विद्यापीठात १९९२ ला मराठी विषयात एम.ए केले. प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासह उच्च शिक्षण त्यांनी चांगल्या गुणांनी पार पाडले.पदवी घेतल्यानंतर त्यांनी मराठी विषयाचे अध्यापक म्हणून ३८ वर्ष कर्तव्य सेवा बजावली.देऊळगाव घाट येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात १९८७ ते १९९३ सहा वर्षे प्रभारी मुख्याध्यापक राहीले.देऊळगाव घाट,जळगाव, पिंपळा येथे मुख्याध्यापक /प्राचार्य पद सांभाळले.दि.१६ जुन २०२३ ते ३१ मे २०२५ या कालावधीत कडा येथीला श्रीराम विद्यालयात प्राचार्यपद प्रभावीपणे सांभाळले. आण्णासाहेब मोरे सामाजिक प्रतिष्ठाण आदर्श शिक्षक पुरस्कार,तहसिल कार्यालय आष्टी व सामाजिक वनिकरणाचे संयुक्त विद्यमाने-आदर्श शिक्षक पुरस्कार. सन २००८ साली -पहिला गंगाई - आदर्श शिक्षक पुरस्कार,समर्थ प्रतिष्ठान,पारनेर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार,शिव समर्थ विधायक विकास संस्था,कान्हूर पठार -रौप्य पदक व प्रमाणत्र पुरस्कार, वनश्री सामाजिक उन्नती सहकारी वृक्ष लागवड संस्था सुरेगाव ता.श्रीगोंदा -वृक्ष लागवड पुरस्कार,सामाजिक वनिकरण विभाग तहसिल कार्यालय आष्टी यांचे संयुक्त विद्यामाने इकोक्लबल शिक्षक पुरस्कार,सामाजिक वनिकरण व तहसिल कार्यालय आष्टी यांचा त्रितारांकित शाळा पुरस्कार,वर्ड ट्राव्हेल आणि टयुरिझम पुणे यांचा- २०२४ चा आदर्श प्राचार्य पुरस्कार,मुख्यमंत्री स्वच्छ,सुंदर शाळा लक्ष रुपयाचा तालुक्यात प्रथम पुरस्कार समाजकारण व राजकारण, 'वेद' काव्यसंग्रहाचे प्रकाशनाचे स्वागताध्यक्ष, आडीच वर्षे ग्रामपंचायत देऊळगाव घाट सदस्य,सलग १० वर्षे महेश सुतगिरणीचे सदस्य,२००२ साली जिल्हा परिषद दौलावडगाव गटातमन निसटता पराभव झाला. आई सत्यभामा काशीनाथ दानवे, वडील काशीनाथ दानवे यांच्या संस्कारातुन महादेव दानवे घडलेले आहेत.पत्नी- सौ. संगिता महादेव दानवे (शिक्षिका, जि.प.प्राथमिक शाळा मिरी ता.पाथर्डी),शैलेश महादेव दानवे हा मुलगा (एम.फार्म) शिपला कंपनी (गोवा) येथे नोकरीत आहे.दानवे ओंकार महादेव (आय.टी इंजिनिअर) कोकणिझंट कंपनी पुणे येथे नोकरीत आहे.सुनबाई-सौ. दानवे कविता शैलेश (आय टी इंजिनिअर) मुली ठोंबरे वर्षाराणी विलास (गृहिणी) सौ. व्यवहारे प्रज्ञा सचिन (एम फार्म). जावाई श्री ठोंबरे विलास माणिकराव (प्राथमिक शिक्षक ता.माढा),व्यवहारे सचिन बाळासाहेब (एम.फार्म ) टी सी एस कंपनी पुणे येथे नोकरीत आहे. आष्टी येथील शिक्षण क्षेत्रामध्ये नामांकित अशा श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्यांनी ही सेवा अत्यंत सन्मानाने आणि प्रमाणिकपणे केली. काशीनाथ दानवे या त्यांच्या वडिलांच्या कठोर परिश्रम जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या प्रेरणेतून त्यांनी अनेक मुलांना शिक्षण आणि संस्काराचे धडे दिले वडील शेती व्यवसाय करत असले तरी मुलांनी मोठ्या मोठ्या पदावर जावे आणि घराण्याचे नाव कमवावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. ती इच्छा महादेव दानवे यांनी पूर्ण केले आहे.प्राचार्य महादेव दानवे यांच्या शिक्षण क्षेत्रातील यश आणि प्रगती पाठीमागे त्यांच्या आई वडिलांचा मोठा आधार,त्याग आहे.आई वडीलांचे तसे शिक्षण जेमतेमच म्हणावे लागेल पण शिक्षणाचे महत्व काय आहे ते त्यांना नक्कीच माहित होते.कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त असणे गरजेचे असते.ती शिस्त त्यांनी आपल्या मुलांना अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून लावण्याचे काम केले.दोघेही कडक शिस्तिचेच पण प्रेमळ.मार्गदर्शन आणि मुलांवर किती कटाक्षानं लक्ष असायला पाहिजे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे प्राचार्य महादेव दानवे यांचे मातापिता.लोकनेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या सहकार्याने ३८ वर्षाहुन अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेले एक शिस्तप्रिय शांत संयमी प्राध्यापक, प्राचार्य असा नावालौकीक प्राप्त करणारे श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महादेव दानवे सर यांचा आज सेवापूर्ती सोहळा होत आहे. --------------- प्रत्येक माणसाचे विधीलिखीत लिहल्याप्रमाणेच त्याच्या हातुन कार्य होत असते.ज्याच्या त्याच्या कर्माने तो त्या क्षेत्रात मोठा होत असतो. समाजकारण हे नेतृत्वगुण अंगी असणारेच करतात.तसे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही अंत्यत मायाळु,शांत संयमी,मातृहृदयी माणसंच प्रभावीपणे कार्य करतात.प्राचार्य दानवे सर हे तर हाडाचे शिक्षक आहेत.शिवाय सामाजिक क्षेत्रातही त्यांना आवड असल्याने ते नेहमी सामाजिक कार्यात सामाजिक जाणिवेतुन काम करत आहेत. महादेव दानवे सर हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने धार्मिक कार्यातही सहभागी असतात.अभ्यासु, निष्पक्ष वर्तवणुक असल्याने समाजात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झालेले आहे.सेवानिवृत्त होत असलेले प्राचार्य महादेव दानवे यांच्या पत्नी सौ.संगीता दानवेया प्राथमिक शिक्षीका आहेत. प्राचार्य महादेव दानवे यांंच्या कुंटुंबात पुतणे व पुतण्या आहेत. कुंटुंबातील लोक राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, देशसेवा,शेतीमध्ये धडाडीने कार्य करत आहेत.आई सतूयभामा दानवे या गृहिणी म्हणून कायम सरांच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून राहिल्या. अत्यंत संयमी शांत आणि धीरदत्त स्वभावाचे प्राचार्य महादेव दानवे सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या पत्नी सौ.संगीता दानवे या शिक्षण क्षेत्रात कर्तव्य सेवा करीत आहेत. तर मुले इंजिनियर वा औषधे कंपनीत आहेत.हे दोन्हीही मुले उच्च शिक्षण घेतलेले आहेत.असे या दानवे परिवारामध्ये उच्च शिक्षणाची मुहूर्त मिळवून एक नवा प्रेरणादायी इतिहास घडवणारे प्राचार्य महादेव दानवे हे आष्टी तालुक्यातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणून नावारूपाला आले आहेत. एकूणच प्राचार्य दानवे यांच्या कुटुंबात पुतण्या आणि पुतण्या आहेत कुटुंबातील बहुतेक लोक राजकीय, सामाजिक व्यावसायिक देशसेवा शेतीमध्ये धडाडीने आणि आत्मविश्वासाने सामान सामाजिक बांधिलकी म्हणून कार्यरत आहेत. या उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक करत जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी आनंदी आध्यात्मिक जीवन जगणारे प्राचार्य महादेव दानवे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या भविष्यातील आनंदी यशदायी जीवनासाठी तमाम त्यांच्या शिष्यांकडून मनापासून प्रार्थना करण्यात येत आहे. प्राचार्य महादेव दानवे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ... ---------------- चौकट ---------- ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये मनापासून कर्तव्य सेवा केली अनेक विद्यार्थी घडले मोठे मोठ्या पदावर ते पोहोचू शकले याचे समाधान आहे सेवानिवृत्तीनंतर मुलांच्या उद्योग, व्यवसायामध्ये होईल तेवढी मदत करून आनंदी जीवन जगण्याचा मानस आहे!' ---- महादेव दानवे (प्राचार्य -श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कडा ) -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या