आयुष्याच्या संध्याकाळी बालमैत्रीच्या गप्पातून जगण्याला ऊर्जा मिळते तेव्हा............ ८० व्या.वर्षाच्या भीमराव शिंदे आणि भीमराव गर्जे यांच्या गप्पांनी लक्ष वेधले! ......... शेकापुरचे दोन भीमरावांनी झाडाखाली सावलीत जुन्या आठवणींना दिला उजाळा...
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील शेकापुर व येथील भीमराव फुंदे आणि भीमराव
गर्जे लहाणपणाचे दोन फेटेवाले बालमित्र.आता शेकापुरात फेटा घालणारे लोक कमीच राहिले
आहेत. 'बालपणीचा काळ सुखाचा...' असे म्हटले जाते; अर्थात कुठल्या समस्या संकट
जबाबदारी या बाबीची खटकट नसल्याने निश्चितच बालपणातील काळ आनंदाचा सुखाचा आणि
समाधानाचा असतो परंतु जस जसे वय वाढते तसे जबाबदाऱ्या पडतात आणि प्रश्नांचा आणि
संकटांचा डोंगर उभा राहतो.कितीही प्रयत्न केला तरी संकट संपत नाही आणि हे संकटांचा
डोंगर संपवतानाच आयुष्याची संध्याकाळ केंव्हा होते आणि जगणे राहून जाते..परंतु अशा
वेळेमध्ये बालपणीचा किमान मित्र भेटला तरी त्या काळच्या गप्पांमधून आयुष्याच्या
संध्याकाळी जगण्याची नवी उर्मी व ऊर्जा आणि शक्ती मिळते त्याचा प्रत्यय आज मंगळवारी
आष्टीच्या बाजार चौकात दृष्टीस आला... त्याचे झाले असे की,प्रचंड तापमान वाढलेले
आहे.४० अंश सेल्सिअस पेक्षाही तापमानाने मर्यादा ओलांडल्याने माणसाला लाहीलाही होत
आहे.अशाच आपल्या खेडेगावातून आष्टीमध्ये भीमराव फुंदे आणि भीमराव गर्जे हे दोन
ज्येष्ठ नागरिक वयाच्या ८० व्या. वर्षानंतर छोट्या मोठ्या कामासाठी आलेले
होते.त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकाला आलिंगन दिले आणि तिथेच मिळेल त्या
सावलीत बसून गप्पा सुरू केल्या.भीमराव फुंदे हे ८० वर्षाचे तर भीमराव गर्जे हे ८५
वर्षाहून जास्त वय असलेले हे बालपणीचे मित्र गप्पांमध्ये रंगून गेले.संकट
समस्यांचना झेलत आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्यातील संवाद पाहताना आणि ऐकताना
उपस्थितांनाही फार मोठा संदेश देत अंतर्मुख व्हायला लागले.आष्टी येथील वरिष्ठ
पत्रकार उत्तम बोडखे यांनी या दुर्मिळ क्षणाला आपल्या भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्यात कैद
केले.विशेष म्हणजे बीड जि.प.चे माजी शिक्षण सभापती नियामत बेग,जेष्ठ पत्रकार
प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,शिक्षक राजेंद्र लाड यांनीही जेष्ठ नागरिक या दोन्ही
भीमरावांशी संवाद साधला.. 'जुनं ते सोनं!' असं म्हणतात.जुन्या काळामध्ये विशेषतः
ग्रामीण भागामध्ये गुलाबी,पांढरा,पिवळा फेटा बांधून प्रत्येक महत्त्वाच्या निर्णय
प्रसंगी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे आजोबा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू असायचे
परंतु अलीकडच्या काळामध्ये हा लाल फेटा आणि जुनी मार्गदर्शक मंडळी दुरापास्त आणि
कालबाह्य होत असल्याची अत्यंत दुर्दैवी बाब आहे.भारत हा खेड्यांचा देश आहे असे
गांधीजी म्हणायचे म्हणूनच खेड्यांचा विकास म्हणजे देशांचा विकास अशी त्यांची भूमिका
होती.त्यानुसार ग्रामीण भागामध्ये सण, वृत्त, वैकल्य,विवाह आणि महत्त्वाच्या निर्णय
प्रसंगी ही जुनी जाणती जेष्ठ मंडळी आजोबा यांनी दिलेला निर्णय हा अंतिम
असायचा.न्यायालय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.लाल भरजरी फेटा,पांढरे शुभ्र
धोतर आणि शर्ट असा साधारणतः पेहराव ग्रामीण भागातील या जेष्ठ मंडळींचा ठरलेला
असे.आजही अशा प्रकारची मंडळी अत्यंत दुर्मिळपणे ग्रामीण भागामध्ये मोबाईलविना
गावाच्या प्रमुख भागातील झाडाखाली बसलेली पहायला मिळतात परंतु दुर्दैवाने आज
त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते.त्यांचे मार्गदर्शन घेतले जात
नाही.त्यामुळे अनेक तरुणांचे निर्णय चुकून अत्यंत चुकीच्या मार्गाने समाज भरकटत
असल्याचे दुर्दैवी वास्तव आहे.संस्काराची मूल्य आज त्यामुळे दुरापास्त झाले
असल्याचे ज्येष्ठांचे म्हणणे आहे.फेट्यावाल्या सर्व आजोबांचे आज मितीस ८० ते ९० वय
आहे.त्यांचे आणखी १५ वर्षे वयोमान आहे. त्यांच्यानंतर फेटा बांधलेला माणुसच दिसणार
नाही.
-------------------
चौकट
--------
भीमराव फुंदे आणि भीमराव गर्जे यांच्या
अत्यंत वाढलेल्या तापमानातही रंगलेल्या गप्पा उपस्थितांना थंडावा देणारे
ठरल्या.आष्टी तालुक्याच्या शेकापूर येथील असलेली ही अस्सल ग्रामीण मराठीमोळे जोडी
जीवनाचा अर्थ शोधायला लावणारी आणि संदेश देणारी सुद्धा नक्कीच आहे!
----------------------
0 टिप्पण्या