
आष्टी (प्रतिनिधी)
पद्मपाणी प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा राज्य
पुरस्कार सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले कालिकादेवी कनिष्ठ
महाविद्यालयातील प्रा.शशिकांत जावळे यांना जाहीर झाला आहे. बीड येथे ४ मे रोजी
त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या १७
वर्षापासून विविध क्षेत्रातील गुणवंतांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात
येते.यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिरूर कासार येथील कालिकादेवी कनिष्ठ
महाविद्यालयातील प्रा. शशिकांत जावळे यांची निवड झाली आहे.सन्मान चिन्ह, संविधान
प्रत आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चार मे २०२५ रोजी बीड येथील
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा पार पडेल.या पुरस्काराबद्दल प्रा. शशिकांत
जावळे यांचे अभिनंदन मुप्टा शिक्षक संघटना व परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य
अध्यक्ष प्रा.सुनील डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष
प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अशोक देवगुडे, जिल्हा सचिव
प्रा.बिभिषण चाटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या