Ticker

6/recent/ticker-posts

शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे यादव व गुंड यांनी प्रमाणिकपणे काम केले ......... आ.धस,माजी आ.धोंडे,माजी आ. दरेकर

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील शैक्षणिक वातावरण चांगले आहे. दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षक,शिक्षीका आहेत.आपल्या सेवाकालात सचोटीने कार्य करत राहणे ही प्रामाणिक अधिका-याचे लक्षण असते.निष्ठेने व प्रमाणिक,चांगले काम केल्यास कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळत असते.सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखी समाधानी जाण्यासाठी आपले काम प्रमाणिकपणे करावे.तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे यादव व गुंड यांनी प्रमाणिकपणे काम केले असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांनी केले. आष्टी येथील पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव आणि ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा रविवारी आष्टी येथील लक्ष्मी लॉन्स मंगलकार्यालयात झाला. यावेळी आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,दिलीप गोरे, डाॕ.शिवाजी राऊत, विजय गोल्हार, देविदास धस, परमेश्वर शेळके, रंगनाथ धोंडे, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, उपशिक्षण अधिकारी भगवान सोनवणे,उपशिक्षण अधिकारी हिरालाल कराड, सेवानिवृत शिक्षण अधिकारी ल.ना.देशपांडे, सेवानिवृत शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी,मोहन काकडे,सेवानिवृत शिक्षण अधिकारी पोपट काळे, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने, राधाकिसन सिरसाट,शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस,पत्रकार उत्तम बोडखे, विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे,निलेश यादव,गोविंद यादव, कैलास दरेकर,बबन औटे,बाबासाहेब मुळीक,पत्रकार देविदास राऊत (मिरजगाव),शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता उगले, शिक्षण विस्तार अधिकारी सीमा काळे,पी.वाय. काळे,प्रा.शिवदास विधाते,रामशेठ मधुरकर,गौतम आजबे, मुख्याध्यापक सुरेश बोडखे आदि उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक संतोष दाणी यांनी केले.जेष्ठ साहित्यिक तथा शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ,माजी आ.भीमराव धोंडे, आ.सुरेश धस, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे भाषणे झाली. यावेळी माजी आ. धोंडे म्हणाले की, शिक्षण हे परिवर्तनशील आहे. सुधाकर यादव व अर्जुन गुंड हे भाग्यवान आहेत. त्यांचा सेवाकाल चांगला गेला. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी या दोघांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. यावेळी आ.धस म्हणाले की,सुधाकर यादव यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण विभागात चांगली सेवा दिली. त्यांच्या सेवेमुळे जिल्हा परिषद शाळा आता ब-यापैकी नावारूपाला आल्या आहेत.विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. शिक्षण उत्कृष्ट पणे शिक्षक देत आहेत.जरेवाडी पॅटर्न आपल्याला आष्टी तालुक्यात राबवायचा आहे त्यासाठी सर्व शिक्षकांनी जोमाने काम करावे आणि प्रामाणिकपणे आप आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य हाती घ्यावे आणि शाळा नावारूपाला येईल असे प्रयत्न सर्वांनी करावे तर सुधाकर यादव व अर्जुन गुंड अशा अधिका-यांमुळे सर्वसामान्यांना बळ मिळते.यापुढे देखील त्यांनी समाजासाठी अशीच सेवा द्यावी. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आ. धस यांनी शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव व शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी तालुक्यात शिक्षण विभागात उत्कृष्ट कार्य केले आहे.त्यांनी प्रामाणिक पणे आपल्या कारकीर्दीत शिक्षक, मुख्याध्यापक व विविध शाळेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सुधाकर यादव हे ९९४ साली सेवेत आले आहेत. सुरुवातीच्या १० वर्षांत त्यांनी धाराशिव आणि बीड जिल्ह्यात शिक्षक म्हणून काम केले. २०१५ मध्ये ते आष्टी पंचायत समितीत विस्तार अधिकारी झाले.नंतर पदोन्नतीने गट शिक्षण अधिकारी झाले असल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव व शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या सेवा कार्याचे अनुभव सांगितले. या कार्यक्रमास शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मारूती पठाडे, मुख्याध्यापक सुरेश पवार,महेश शिंदे, सुभाष भादवे, चंद्रशेखर खाडे, धर्मनाथ शिंदे, दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, जावेद पठाण,समीर शेख,राजेंद्र लाड, सचिन रानडे,शरद गर्जे,अक्षय विधाते व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षिका,विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले तर पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे यांनी आभार मानले. ***************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या