
आष्टी (प्रतिनिधी)
मिळालेल्या देहाचा सदुपयोग करा दुरुपयोग करू नका. देहाचा उपयोग
उपभोगाकरिता केला तर मोठी हानी होते. पापाचा पैसा खाण्यासाठी पूर्ण गाव येते पण
फेडण्याकरता स्वतःला जावे लागते त्यामुळे पाप करू नका.भगवान देता है तो छप्पर फाडके
देता है और लेता है तो चमडी फाड कर लेता है.ज्या घरात संपत्ती आणि दया आहे
त्याठिकाणी लक्ष्मी राहते. त्या घरमालकाने लक्ष्मीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला
तरी लक्ष्मी बाहेर जात नाही.देवाचा प्रसाद मिळाल्यानंतर जीवनात दुःखाचा लवलेश
शिल्लक राहत नाही.ज्यांनी शिवस्वरूप बाबांची प्रामाणिक सेवा केली त्यालाच
काल्याच्या प्रसादाचा अधिकार आहे.प्रत्येक क्षेत्रामधील प्रत्येकाला वाटते की
आपल्या क्षेत्रामध्ये पूर्णतः व्हावी पण तसे होत नाही. उदा,समुद्रामध्ये बारा महिने
पाऊस पडला आणि सर्व नद्या समुद्राला मिळाल्या तरीही समुद्र भरत नाही आणि त्याच्या
उलट बारा महिने पाऊस पडला नाही तरी पण समुद्रातील पाणी दोन इंच पण कमी होत नाही.
देवाने दिलेल्या देहाचा सदपयोग कसा करावा हे संत संगतीत आल्या शिवाय कळत
नाही.चोऱ्या कशा कराव्या हे पुढाऱ्यांना विचारा आणि जीवनाचे कल्याण कसे करावे हे
साधू संताला विचारा देहाचा दुरुपयोग करू नका. माणसाने केलेल्या हत्येची परतफेड
करावी लागते.देवाने श्रीमंती दिली पण दान केले नाही तर काय होते तर आता जे घाटावर
भीक मागतात ते पूर्वी श्रीमंत होते त्यांनी कधी उष्ट्या हाताने कावळा हाणला नाही ते
असतात.ग्रहस्थी माणसाच्या दारातून एखाद्या याचक विन्मुख गेला तर त्या याचकाचे काही
होत नाही पण घर मालकाचे मागील पुण्य संपते.धाब्याचा काळ आला आणि अतिथी धर्म बुडाला
घरचे माणसेच घरी जेवत नाहीत तर अतिथीला कुठून जेवण देणार ? असा प्रश्न उपस्थित करीत
ज्या घरात संपत्ती, दया आहे तेथे लक्ष्मी राहते त्या घरमालकाने लक्ष्मीला बाहेर
काढण्याचा प्रयत्न केला तरी लक्ष्मी बाहेर जात नाही असे प्रतिपादन ह.भ.प. एकनाथ
महाराज चत्तर शास्त्री यांनी केले. आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र कासारी येथे संत
शिवस्वरूप बन महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त दि.१९ ते २६ एप्रिल २०२५ या
कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. ह.भ.प.चतर
शास्त्री बोलताना पुढे म्हणाले की, फुकट देणे हे भगवद्ग गीतेच्या विरोधात
आहे.ज्ञानेश्वर महाराज सांगतात जी माणसे आपल्या पोटापुरते काम करत नाहीत ते
देवाच्या दर्शनासाठी सुद्धा योग्य नाहीत. शासनाने फुकटचे काही देऊ नये, द्यायचेच
असेल तर शेतीमालाला हमीभाव द्या सेंद्रिय औषध आणि खताचा टॅक्स कमी करा तरुणांच्या
हाताला काम द्या.ज्यांनी शिवस्वरूप बाबांची प्रामाणिक सेवा केली त्यालाच काल्याच्या
प्रसादाचा अधिकार आहे. प्रत्येक क्षेत्रामधील प्रत्येकाला वाटते की आपल्या
क्षेत्रामध्ये पूर्णतः व्हावी पण तसे होत नाही. उदा,समुद्रामध्ये बारा महिने पाऊस
पडला आणि सर्व नद्या समुद्राला मिळाल्या तरीही समुद्र भरत नाही आणि त्याच्या उलट
बारा महिने पाऊस पडला नाही तरी पण समुद्रातील पाणी दोन इंच पण कमी होत नाही. देवाने
दिलेल्या देहाचा सद उपयोग कसा करावा हे संत संगतीत बसल्याशिवाय कळत नाही.चोऱ्या कशा
कराव्या हे पुढाऱ्याला विचारा आणि जीवनाचे कल्याण कसे करावे हे साधूला विचारा
देहाचा दुरुपयोग करू नका. माणसाने केलेलया हत्येची परतफेड करावी लागते.देवाने
श्रीमंती दिली पण दान केले नाही तर काय होते तर आता जे घाटावर भीक मागतात ते पूर्वी
श्रीमंत होते त्यांनी कधी उष्ट्या हाताने कावळा हाणला नाही ते असतात.ग्रहस्थी
माणसाच्या दारातून एखाद्या याचक विन्मुख गेला तर त्या याचकाचे काही होत नाही पण घर
मालकाचे मागील पुण्य संपते.धाब्याचा काळ आला आणि अतिथी धर्म बुडाला घरचे माणसेच घरी
जेवत नाहीत तर अतिथीला कुठून जेवण देणार असेही शेवटी शास्त्री महाराज म्हणाले.
यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,देविदास धस,सेवानिवृत्त आयुक्त सुनील चव्हाण,सतीष
शिंदे,डॉ. शिवाजी राऊत,दशनाम गोसावी संघटनेचे बीडचे संस्थापक अध्यक्ष ॲड.राजेंद्र
बन, ह.भ.प.ब्रम्हचैतन्य महाराज तावरे,आष्टी दूध संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले,
उद्योगपती अण्णासाहेब चौधरी, उद्योगपती संदीप गोसावी (पुणे), बाळासाहेब बनगे
(तलाठी),सरपंच अशोक मुळे,माजी सरपंच आदिकाताई लोखंडे,माजी सरपंच मनीषा मुटकुळे
(मांडवा),दिलीप फौजी मुटकुळे, ह.भ.प.श्रीहरी महाराज पुरी, ह.भ.प.शिवाजी कोकणे
महाराज, ह.भ.प.पांडुरंग भालके महाराज,नाना महाराज भोगाडे,तुकाराम भोसले
महाराज,परसराम महाराज बन,अंकुश बन अकलूज, सायकड सर,प्रशांत शेंडगे (पुणे),रिटायर
मेजर रामदास चव्हाण,डॉ.दत्तात्रय भोसले, रामदास बन,राजेंद्र बन, वसंत बन,आबासाहेब
साप्ते,दिलीप गिरीसर,भागवत गिरी,रामनाथ बन,संजय गिरी,जालिंदर सोमासे,सूर्यभान धुमाळ
आदी हजारो भाविक भक्त उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन दिलीप गिरी सर यांनी केले.
मान्यवरांचे व महाराजांचे सत्कार रामनाथ बन,अमोल बन,सदाशिव बन, आबा सापते, भागवत
गिरी,रवि बन यांनी केले.हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी शिवस्वरूप सप्ताह कमिटी आणि
तरुण मंडळाने परिश्रम घेतले. चौकट ********** या सप्ताहामध्ये पुढील वर्षासाठी नारळ
उचलले रामनाथ बाबुराव बन १ लाख ११ हजार १११ रुपये, विठ्ठल युवराज गिरी
(राजशिष्टाचार अधिकारी पुणे) यांचे १ लाख ११ हजार १११ रुपये,पत्रकार कै. दादासाहेब
आत्माराम बन यांच्या स्मरणार्थ उमेश आत्माराम बन यांच्याकडून ५१ हजार रुपये जाहीर
करण्यात आले.
0 टिप्पण्या