Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव यांचा आज सेवापुर्ती गौरव सोहळा

ले
विशेष लेख ---------- उत्तम बोडखे. ..आष्टी.. शिक्षण क्षेत्रातील ३५ वर्षे सेवा झाल्यानंतर आपल्या हातुन अनेक आदर्श विद्यार्थी घडलेले आहेत.आपल्या आयुष्यातील ही मौलिक सेवा आहे. आपल्या सेवेवरची निष्ठा आपल्याकडून काम करवून घेत असते.कौटुंबिक आयुष्यासाठी जी धडपड सुरु असते त्याची सफलता त्या परिश्रमात दडलेली असते सेवापूर्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवागौरव होणे महत्त्वाचे असते. शिक्षण विभागात शिक्षक, मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी पदावर ३५ वर्षे प्रभावी व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे उत्कृष्ट सेवा करणारे गटशिक्षण अधिकारी सुधाकर सीताराम यादव यांचे उल्लेखनीय काम आहे.शालेय विद्यार्थ्यां बरोबरच त्यांनी आपल्या पाल्यांवरही सुसंस्कार घडविलेले आहेत.त्यांचे पाल्य उच्च पदस्थ आहेत. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात प्रमाणिकपणे केलेल्या कामाची ती पावतीच आहे. आष्टी पंचायत समितीतील गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव यांंचा आज सेवापूर्ती सोहळा होत आहे.सुधाकर यादव यांनी शैक्षणिक तसेच प्रशासकीय काम उत्कृष्ट केलेले आहे.त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडविले आहेत.अनेक आदर्श विद्यार्थी घडविलेले आहेत. आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार करीत त्यांना उच्च प्रतिचे शिक्षण दिले आहे. आपल्या सेवाकालात त्यांनी खुप त्याग व कष्ट घातले आहेत. यादव यांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श सर्व नवोदित शिक्षकांनी घ्यावा.सर्व शिक्षकांनी शाळेत नियमीतपणे यावे व पुर्ण वेळ थांबावे व अभ्यासपूर्ण अध्यापक करावे असे यादव सतत शिक्षकांना सांगतात. आई वडीलांमुळेच मी शिक्षक झालो.मला माझ्या ३५ वर्षाच्या सेवकालात सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. " कष्टाची भाकरी गोड लागली लुटावे कोणाला कधी जमलेच नाही.. चेहरा आरशासारखा स्वच्छ आहे.. मुखवटा लावणे कधी जमलेच नाही... जे लाभले ते आनंदाने स्विकारले.. कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही.. जीवन साधेसरळ आहे भूलथापा मारणे, खोटे बोलणे, कोणाला फसवणे कधी जमलेच नाही... मोट बांधली प्रत्येकवेळी प्रेमळ माणसांची आजपर्यंत काही कमी पडलेच नाही.... " हे वाक्य तांतोतत गटशिक्षण अधिकारी सुधाकर सिताराम यादव यांना लागु होतात. केज तालुक्यातील होळ येथे शेतकरी कुंटुबात जन्मलेले सुधाकर यादव हे उच्च पदस्थ अधिकारी बनले.१२ एप्रिल १९६७ रोजी जन्मलेले यादव यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होळ येथे झाले.माध्यमिक शिक्षण होळ येथील होळेश्वर विद्यालयात झाले.उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात झाले.शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणी येथे बी.एड. झाले.१२ जून १९८९ रोजी माध्यमिक शिक्षक म्हणून साने गुरुजी विद्यालय भावठाणा (ता.अंबाजोगाई) येथे रुजू झाले होते.जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून दि.१८ जुलै १९९४ रोजी रुजू झाले.१० जून २००४ रोजी जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग अंतर्गत पंचायत समिती आंबेजोगाई येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले.२ जून २०१५ रोजी गटशिक्षण कार्यालय आष्टी येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले. जुलै २०१७ ते जुलै २०२० पर्यंत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद येथे प्रतिनियुक्तीने विषय सहाय्यक म्हणून विज्ञान विभागामध्ये कार्यरत राहिले. सद्यस्थितीमध्ये प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून आष्टी येथे कार्यरत होते.राज्यस्तर आणि विभागस्तर, जिल्हास्तर या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक प्रशिक्षणामधून त्यांचा सहभाग राहिला.राज्यस्तरावरून घेण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणामध्ये पर्यवेक्षक म्हणून सहभाग होता. साक्षरता अभियान कार्यक्रम आणि ग्रामविकास कार्यक्रम यामध्ये सहभाग घेतला होता.प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ मध्ये परिसर अभ्यास विषयाच्या अभ्यास मंडळ सदस्य म्हणून सहभाग घेतला होता.राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयांच्या कार्यशाळां मध्ये आणि लेखनामध्ये सहभाग घेतलेला आहे.अशा या हुरहुन्नरी अधिकारी असलेल्या सुधाकर यादव यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा आज रविवार दि.२७ एप्रिल रोजी आष्टी येथील लक्ष्मी लाॕन्स मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.आ.सुरेश धस यांच्या शुभहस्ते गौरव केला जाणार आहे.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर, माजी आ. बाळासाहेब आजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य जीवने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आष्टीचे गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव यांना सेवानिवृतीच्या शुभेच्छा... --- उत्तम बोडखे,आष्टी. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या