,,

आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात
आलेल्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत रेसिडेन्शिअल हायस्कूल अँड ज्युनिअर
कॉलेजचा विद्यार्थी सार्थक बिभिषण चाटे यांने उत्कृष्ट यश संपादन केले असून
विद्यालयाच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. सार्थक चाटे हा पाचवी
शिष्यवृत्ती परीक्षेतीलही पात्रताधारक गुणवंत आहे. यंदा आठवी ची परीक्षा फेब्रुवारी
२०२५ मध्ये झाली.या परीक्षेचा निकाल शुक्रवारी शिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेत
स्थळावरून जाहीर करण्यात आला.सार्थक यास २२२ गुण प्राप्त झाले असून तो पात्रता धारक
ठरला आहे.या यशाबद्दल सार्थकचे अभिनंदन मुख्याध्यापक बालाजी गायकवाड,उपमुख्याध्यापक
रायते,पर्यवेक्षक मकासरे, वर्गशिक्षक श्रीमती कराळे, दहिफळे सर, शिक्षणतज्ञ बबनराव
पवार,श्रीमती वैशालीताई पवार, माजी आमदार संजय दौंड, ॲड. गोविंदराव फड,प्रा.डॉ.
बिभिषण फड,मुख्याध्यापक बाळासाहेब घोरपडे व एकनाथ माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक
वृंद तसेच मुख्याध्यापक वारभुवन, प्रा.शांतीलाल जायभाये, इन्स्पेक्टर राजेंद्र
दराडे, सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.संजय सानप,डॉ.सोमनाथ बडे, डॉ. योगेश व डॉ.सरोजिनी
फुंदे, गोरक्षनाथ शेळके, सर्जेराव वारे, विठ्ठल जायभाये, सहाय्यक नियोजनाधिकारी
राधाकृष्ण ईघारे,उद्योगपती उत्तमराव मिसाळ, डॉ.प्रा.अशोक देवगुडे, भाजपा भटक्या
जमाती आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष भाग्यश्रीताई ढाकणे, साहित्यिक अनंत कराड,
सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे,प्रा.सुनील डिसले,प्रा. डॉ.झिंजुर्डे, सहाय्यक
व्यवस्थापक कराड,भाग्यश्री गडदे, प्रा.डॉ.लहाडे,प्रा.डॉ. अरविंद घोडके,पायमोडे सर,
दुसुंगे सर,नांगरे सर,गणेश डमाल सर,जाधव सर आदींनी अभिनंदन केले आहे.
चौकट
--------
सार्थक चाटे हा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ही पात्रता धारक ठरलेला आहे.मंथन
परीक्षेतही तो गुणवत्ता यादीत आलेला असून सुंदर हस्ताक्षर व सामान्य ज्ञान परीक्षेत
तो चमकला आहे.या यशाचे कौतुक करत भविष्यात कठीण परिश्रमातून यशाचे शिखर गाठावे अशी
अपेक्षा आदर्श शिक्षिका सौ.बबीताताई बोडखे यांनी व्यक्त केली आहे.
---------------------------------
0 टिप्पण्या