Ticker

6/recent/ticker-posts

मंदारबुवा रामदास यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या कार्याचा गौरव

आष्टी (प्रतिनिधी‌) गेल्या तीन दशकावून अधिक काळ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वैचारिक आदीसह विशेषतः धार्मिक क्षेत्रामध्ये सातत्याने आपली लेखणी सक्षमपणे चालवत संत सज्जनांच्या विचार कार्याला शब्दबद्ध करून लेखणीच्याद्वारे जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याचे अमूल्य कार्य करणारे जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या कार्यकर्तृत्वावर शाब्बासकीची थाप देत रामनवमीचे औचित्य साधत मंदारबुवा रामदास यांच्या शुभहस्ते उत्तम बोडखे यांचा गौरव करण्यात आला.आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव धार्मिक सोहळा अत्यंत पवित्र वातावरणात संपन्न होत आहे.आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीराम मंदिर आहे.समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दादेगावात समर्थ शिष्य देवदास स्वामी यांची समाधी आहे. येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची ३७७ वर्षाची परंपरा आहे. शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार बोडखे यांनी रामकथा अत्यंत अंतकरणातून श्रवण केली.दरम्यान, दादेगावकरांच्या उपस्थितीमध्ये मंदार महाराजा रामदास यांनी उत्तम बोडखे यांच्या आजपर्यंतच्या कार्यकर्तृत्वाला विशेष दाद दिली. त्यांची लेखणी अत्यंत तळमळीने धार्मिक कार्यकर्तृत्वासाठी सदैव पुढे राहते, असा गौरव करून शाल आणि प्रभुरामाची प्रतिमा देऊन गौरव केला. बोडखे यांच्या धार्मिक कार्याला पाठबळ दिले. यावेळी आ.सुरेश धस,जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, बाळासाहेब मेहेर, गणेश शिंदे, प्रा. नामदेव विधाते आदि दादेगाव ग्रामस्थ परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या