Ticker

6/recent/ticker-posts

भगवंताचा अवतार हा भक्तांच्या कल्याणासाठी ...... ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज

आष्टी (प्रतिनिधी) अखंड ब्रह्मंडांच्या नायकाचे चिंतन आणि मनन हे मानवी जीवनाचे साध्य असते. भगवंताच्या सानिध्यातील मिळणारा आनंद हा वैश्विक,शाश्वत व चिरंतन असतो किंबहुना वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिले अहंता मग कोठे ? देव बघायचा नव्हे,तर अनुभवण्याची बाब आहे असे सांगून सत्य अहिंसा समता बंधुत्व ऐक्य आणि सर्व धर्म सम भाव या मूल्यांची सदैव गरज असते. भगवंताचा अवतार हा भक्तांच्या कल्याणासाठीच असतो असे प्रतिपादन ह.भ.प. श्रीहरि पुरी महाराज यांनी केले. आष्टी येथील श्रीराम मंदीरात रामनवमीनिमित्त आयोजित रामनवमी महोत्सवात राम जन्मोत्सवाचे कीर्तन सेवेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.सुरेश धस,राजेंद्र धोंडे, गाणगापूरचे ह.भ. प.यशवंत गिरीजी महाराज, ह.भ.प. दिनकरराव तांदळे, ह.भ.प.रामदास डोरले महाराज, ह.भ.प.पोकळे महाराज,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,खंडुदादा जाधव,निळकंठ खेडकर,संग्राम गळगटे,ॲड. बाबुराव अनारसे, अशोक डोके सर, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,संजयशेठ मेहेर,माजी नगराध्यक्ष भारत मुरकुटे,माजी नगरसेवक प्रविण कदम,शहराध्यक्ष बाबु कदम,सुरेश गोरे,भाऊसाहेब कोकणे,सुभाष बोरुडे,लाला महाराज राक्षे, शिवदास केरुळकर, अनंत देवा जोशी, अनिल बिवरे देवा, किसनराव रासकर, बाळासाहेब सोले, प्रा.काकासाहेब सोले,शाहुराव लाड, आबा गांगर्डे आदि सामाजिक, राजकीय,धार्मिक,व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज यांनी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा तेजस्वी दीपस्तंभ आपल्या वाणीतून निर्माण केला आहे. व्यवहारिक जीवनात शांतता महत्त्वाची असल्याचे सांगून वाणी अत्यंत रसाळ असलेल्या पुरी महाराजांनी जीवनात पाच भाग्य असावीत असे सांगितले. मानवी देहाने स्वयंस्फूर्त भक्ती करायला मिळावी, सज्जनपणा,नम्रता अंगी यावी,दान देण्याची सवय असावी,दाता व्हावे.परोपकारी व्हावे या मूल्यांना विशेष स्थान देत मानवी जीवनातील सुखाची देवाची सुद्धा इच्छा असते असे त्यांनी सांगितले.देवाच्या नामस्मरणात मानवी देहाचे सुख असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. श्रीराम नवमीच्या निमित्ताने पुरी महाराजांची किर्तन सेवा रामाच्या मूल्यात्मक जीवनाच्या अनुषंगाने विविध दृष्टांतातून मार्गदर्शनात्मक सेवा घडणार आहे. दरम्यान,आजच्या स्थितीतसुद्धा केवळ प्रबोधनाचा ध्यास मनी घेऊन सर्वसामान्य गोरगरीब, दीनदलित,दुबळ्या, अनाथ,अपंग, शेतकरी,शेतमजूर आणि वंचित घटकांसह शिक्षण आणि संस्काराचा मंत्र देणारे ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांचा सत्कार संयोजन समीतीचे वतीने करण्यात आला. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या