Ticker

6/recent/ticker-posts

डाॕ.संजय तांदळे प्रज्ञावंत, प्रतिभावंत, निस्वार्थ समाज बांधिलकीचे प्रेरणास्त्रोत

मराठी भाषेविषयी चा प्रचंड अभिमान आणि अमृता पेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना तसेच आपल्या शब्द आणि कार्यकर्तृत्वावर सार्थ विश्वास ठेवत जीवनाची दिशा निस्वार्थ भावनेने आणि आपल्या प्रतिभावंत अलौकिक प्रज्ञावंत आणि समाज बांधिलकीचा भाव शरीराच्या प्रत्येक रक्तात भिणलेला एक संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलेला अवलिया म्हणून बीड नगरीच्या इतिहासातील डॉ. संजय तांदळे नामक समाज कार्यकर्तृत्वाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल! शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा मंत्र मनामध्ये घेऊन.. आणि समतेचा ध्वज उभारण्याची क्षमता निर्माण करत संकट प्रसंगी रस्त्यावर कोणीही असेल तर त्याला धावून जाऊन मदत करण्याची भावना... या संवेदनशील भूमिकेतून डॉ. संजय तांदळे यांचा पिंड तीन दशकानंतर कायम तयार झालेला आहे. शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वावर वाटचाल करताना छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ यांची प्रेरणा मानून आणि संत भगवान बाबा, संत वामन भाऊंच्या चरणी नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाणारे हे व्यक्तिमत्व बीडला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. डॉ.संजय तांदळे गेल्या तीन दशकापासून रस्त्यावर सातत्याने समाजसेवेचा बंध निर्माण करणारे एक सर्जनशील शांत संयमी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे. कुठलीच अपेक्षा किंवा स्वार्थ घेऊन ते पुढे कधी आलेले दिसत नाहीत. इतरांच्या सुखात स्वतःचे सुख मानणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बीड शहरांमध्ये वंजारी वधु वर सूचक मेळावा घेऊन अनेक सर्वसामान्य आणि विविध घटकातील कुटुंबांच्या जीवनामध्ये विवाहाच्या माध्यमातून नवा आनंद निर्माण करण्याची भावना मनी बाळगून सेवारत असलेले हे व्यक्तिमत्व! 2024 मध्ये तर डॉक्टर संजय तांदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक केलेल्या असंख्य समाजधूरीन महिला आणि बांधवांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी हजारो सन्मानपत्र आणि गुन्नीजणांना प्रदान करून एक वेगळा इतिहास रचला आहे. सामाजिक समतोल निर्माण करणे, त्याच समवेत शिक्षण संस्कृती धर्म समाज मूल्य आणि त्यात सर्व समावेशक मानवी समाज भावनेमध्ये खऱ्या अर्थाने निखळ सौंदर्य निर्माण करून प्रगतीचा आलेख उंच ठेवणारे डॉक्टर संजय तांदळे आज अनेकांचे प्रेरणास्त्रोत ठरू लागले आहेत. ..
सततची धडपड, इतरांच्या साठी कार्यप्रवण असलेले हे व्यक्तित्व असून त्यांचा आज अभिष्टचिंतन दिन आहे. इतरांच्या सुखात सुख मानताना घाई मध्ये कदाचित त्यांचा वाढदिवस आहे हे त्यांच्याही स्मरणात नव्हते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज शुक्रवारी त्यांना अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याला पाठीवर शाब्बासकीची थाप देत कौतुक पात्र केले आहे! डॉ. संजय तांदळे यांना आनंदी दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!! * ---- प्रा.बिभिषण चाटे **********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या