
आष्टी (प्रतिनिधी)
अनुसूचित जाती जमातीच्या जामखेडमधील एका वस्तीग्गृहात इयत्ता
आठवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीचे विद्यार्थी बेल्ट आणि चापटा बुक्क्यांनी
प्रचंड बेदम अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओतील
दृश्य पाहता संबंधित विद्यार्थ्यावर कठोर कारवाई करून संबंधित वसती गृहातील
कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकातून होत
आहे.संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसांच्या तळपायाची आग मस्तकाला
जातेय. गोरगरीब घरची मुले शिकून काहीतरी करण्यासाठी वसतिगृहात राहतात; परंतु याच
वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांचे कुठलेच लक्ष नसल्याने इयत्ता नववीचे विद्यार्थी
रैंगीगच्या नावाखाली आठवीतील विद्यार्थ्यांना प्रचंड वेदनादायी मारहाण करतात हे
दृश्य जामखेड करांसह पुरोगामी महाराष्ट्र वासियांना संताप निर्माण करणारे आहे.हा
व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील
यांनी या वस्तीगृहात भेट दिली.पुढील तपास कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान,या वसतीगृहातील या विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष महाराणीचा सर्व स्तरातून
प्रचंड निषेध व्यक्त करण्यात येत असून या वस्तीगृहातील संबंधित विद्यार्थ्यांवर
कठोर कारवाई करावी आणि जबाबदार जे कोणी कर्मचारी आणि चालक असतील त्यांच्यावर कठोर
कारवाई करून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा सर्वसामान्य माणूस रस्त्यावर
उतरेल असा इशारा देण्यात आल्याचे समजते.
0 टिप्पण्या