
आष्टी (प्रतिनिधी)
शिक्षक म्हणजे शिस्त,क्षमा आणि कर्तृत्व या त्रिसूत्रीचा मिलाप
म्हणजे शिक्षक होतो. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेत अखंडपणे ३३
वर्षे शैक्षणिक कार्य करणारे भीमराव आहेर आहेत.३३ वर्ष ज्ञानदाना बरोबरच विवध
कार्यात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.सांस्कृतिक समिती, परीक्षा समिती,सहल समिती
आणि शालेय पोषण आहाराचे काम देखील त्यांनी चांगले केलेले आहे.अध्यापनातील
विषयांपैकी इंग्रजी त्यांचा मुख्य विषय इंग्रजी विषयाचे विषय प्रमुख म्हणून त्यांनी
जबाबदारी सांभाळली.नेहमी हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणारे मुख्याध्यापक
भीमराव आहेर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा.
मुख्याध्यापक भीमराव आहेर यांचे सेवाकालातील शैक्षणिक कार्य उत्तम असल्याचे
प्रतिपादन शेतकरी शिक्षण संस्थेचे सचिव तथा सीनेट सदस्य डाॕ.अजयदादा धोंडे यांनी
केले. आष्टी तालुक्यातील जळगाव येथील जयभवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक भीमराव आहेर
यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी राऊत, माऊली बोडखे,सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी
डी.एस. राऊत,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,ॲड रत्नदिप निकाळजे, शिवाजी आव्हाड,
भाऊसाहेब घुले,सेवानिवृत मुख्याध्यापक जी.आर.बोराटे, सेवानिवृत मुख्याध्यापक के.
एस.गदादे,माजी सरपंच राम धुमाळ, माजी सरपंच माऊली गदादे, माजी सरपंच पोपट
धुमाळ,सेवानिवृत मुख्याध्यापक आजिनाथ बोडखे,गहिनीनाथ गदादे,रावसाहेब जाधव,
सेवानिवृत मुख्याध्यापकअशोक टेकाडे,बबन धुमाळ,डाॕ.नवनाथ चांगुणे,बाला फालके,विकास
धात्रक,आजिनाथ गदादे,राम पवार, मुख्याध्यापक सुधाकर कुलकर्णी, बद्रीनाथ आजबे,
रामदास गदादे, ताराचंद कानडे, डाॕ.संतोष जाधव नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित
होते. कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने झाला.यावेळी १० वी.मधील कु.प्रगती जगताप हीने
आपले मनोगत व्यक्त केले. विशाल भीमराव आहेर,नितीन निमोणकर,शिवाजी आव्हाड, ॲड.
रत्नदीप निकाळजे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रशासकीय अधिकारी तथा जयभवानी
विद्यालयाचे फाऊंडर इंग्रजी विषयाचे शिक्षक डाॕ.डी. बी.राऊत यांचे भाषणे झाले.
जयभवानी विद्यालयाच्यावतीने भीमराव आहेर व सौ.मीराबई आहेर यांचा सत्कार करून पुढील
आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शिक्षक एड.डी. राऊत,एल.एम.
मोहळकर,एन.आर. चांगुणे,बी.डी खराडे, एम.एस.निमोणकर, श्रीमती ए.एम. रासकर,श्रीमती
व्ही.के.बोरुडे,ए. एन.पवळ,कांबळे, पी.यु.विधाते,एच.एस.अनारसे,एल.टी.विधाते,किशोर
वाल्हेकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन एड. डी.राऊत यांनी
केले.
0 टिप्पण्या