Ticker

6/recent/ticker-posts

धनश्री पतसंस्थेने मयत अशोक लोखंडेंच्या कुटुंबाला ६ लाख ८२ हजार रु.आ.सुरेश धस यांच्या हस्ते प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील चांगल्या कामासाठी संपुर्ण बीड जिल्हात नावलैकीक असलेली व शासकीय निकषानुसार आष्टी तालुक्यातील एकमेव सक्षम असलेली आष्टीच्या धनश्री पतसंस्थेने कर्जदार अशोक लोखंडे यांचा एस.बी.आय. लाईफ या कंपनीचा विमा काढलेला होता. अशोक लोखंडे यांचे दि. १६ आक्टो.२०२४ रोजी अकाली निधन झाले,लोखंडे कुंटुबावंर दुःखाचा डोंगर कोसळला,अशोक लोखंडे हे ग्रामसेवक होते.त्यांचे व्याक्तीमत्व प्रामाणिक होते, त्यांनी त्याच्या कर्जाची ·परतफेड नियमित सुरु ठेवलेली होती. एस.बी.आय.लाईफ विमा कंपनीने विम्याची १०० टक्के रक्कम ८ लक्ष रुपये मंजुर करुन पतसंस्थेकडे वर्ग केले संस्थेने आपले कर्ज वजा जाता ६ लाख ८२ हजार रुपयाचा घनादेश लोंखडे यांच्या कुटुंबात आ.सुरेश धस यांच्या हस्ते प्रदान केला.यावेळेस पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ धोंडे, पतसंस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्याक्ष नवनाथ लोंढे, संदस्य ग्रामसेवक रामेश्वर भवर, उपस्थित होते.यावेळी लोंखडे कुंटुबीने धनश्री पतसंस्तेचे आभार मानले तर १०० टक्के विमा मंजुर केल्यामुळे संस्थेचे चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी एस.बी.आय.लाइफ कंपनीचे आभार मानले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या