
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टीचे माजी आ.भीमराव आनंदराव धोंडे यांचे वडील स्व. आनंदराव
धोंडे उर्फ बाबाजी यांचे १६ वे.पुण्यस्मरण आणि लोकनेते भीमराव धोंडे यांचे लहाण
बंधु महेश (कडा) साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा शेतकरी शिक्षण संस्थेचे
उपाध्यक्ष स्व.बापुराव धोंडे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि.२१ एप्रिल
२०२५ रोजी कीर्तन केसरी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे (गेवराई) यांचे सुश्राव्य
हरिकीर्तन होणार आहे. रुईनालकोल येथील महेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
आवारात सकाळी १० ते १२ यावेळात हरिकीर्तन होणार आहे.यावेळी आजी,माजी आमदार,राजकीय
नेते,पदाधिकारी,जि.प.व.पं.स.चे माजी माजी पदाधिकारी, सदस्य,आजी - माजी सरपंच,
प्राध्यापक,शिक्षीक, कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित
रहावे असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले. महेश विद्यालयाच्या मैदानावर
कीर्तन होणार आहे. ह.भ.प.आक्रुर महाराज साखरे यांच्या सुश्राव्य हरिकीर्तनानंतर
उपस्थित मान्यवरांकडुन श्रध्दांजली अर्पण केली जाणार आहे.स्व.बापुराव धोंडे यांनी
लोणी सय्यदमीर जि.प. गटातुन सदस्य म्हणुन निवडुन येऊन पाच वर्षे तर आणि हरिनारायण
आष्टा जि.प.गटातुन निवडुन येत पाच वर्षे जनसेवा केली.या दोन्ही गटाचे प्रतिनिधित्व
बापुकाका धोंडे यांनी केले. आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी
पतसंस्थेचे माजी चेअरमनपद,महेश (कडा) साखर कारखान्याचे चेअरमनपदही यशस्वीपणे
सांभाळले होते.शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमनपद आणि शेतकरी शिक्षण संस्थेचे
संचालकपद, उपाध्यक्षपदही बापुकाकांनी भुषविले होते.एक शांत,सरळ मार्गी,
निगर्वी,संयमी आणि प्रचंड बंधुप्रेम जपणारा भाऊ अशी बापुकाकांची जिल्हाभर प्रतिमा
होती.राजकीय, सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,कृषी क्षेत्रात बापुकाकांचे उल्लेखनीय काम
होते.निर्मळ मनाचा,मैत्री जपणारा आणि साधा भोळा मोठ्या मनाचा माणुस म्हणुन बापुराव
धोंडे यांची ओळख होती.
-----------------
0 टिप्पण्या