
आष्टी (प्रतिनिधी)
पाटोदा येथील विठ्ठलगड हे अध्यात्मिक केंद्र बनले आहे.
साधुसंताच्या उपस्थितीत श्री क्षेत्र विठ्ठलगड पाटोदा असे नामणार सोहळा एक
वर्षापूर्वीच झाला.बीड जिल्ह्याच्या पाटोदा येथील अत्यंत कष्टातून उभारलेल्या
विठ्ठलगड संस्थानाच्या पवित्र स्थळी सर्वसामान्य गोरगरीब, दिनदलीत,दुबळ्या,अनाथ,
अपंग,शेतकरी,शेतमजुरांसह वंचित घटक आणि ऊसतोड कामगारांच्या मनाला शांती, समाधान आणि
भक्तीमय वातावरणात दुःख नाहीसे होऊन नवी तेजस्वी आत्मविश्वासाची भावना निर्माण होऊन
हृदयात अध्यात्मिक सुगंध निर्माण करण्यासाठी केले जात असलेले हे प्रयत्न ही
राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापूंच्या संकल्पनेची सर्वोच्च विचार
धारा आहे.दि.१९ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम
सप्ताह श्रीक्षेत्र विठ्ठलगड येथे समाज प्रबोधनकार ह.भ.प. महंत रामकृष्ण रंधवे बापु
यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा येथे होणार आहे. या सप्ताहाचा ह.भ.प.श्री.रंजित
(दादा) जाधव यांचे शुभ हस्ते प्रारंभ व होणार आहे. तुमच्या जीवनात सुख-शांती समाधान
नांदावा व मुक्ती मिळावी म्हणून जागृतीची गरज आहे.मी सत् चित् आनंद स्वरुप आहे.हा
बोध व्हावा याकरिता कथा किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.श्री. रामकृष्ण रंधवे
(बापू) महाराज यांनी केले आहे.या सप्ताहात काकडा आरती,विष्णु
सहस्त्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ, हरिकिर्तन,
हरिजागर आदि दैनिक कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक
तथा नेत्रतज्ञ ह.भ.प.डॉ.भागवतराव मोटे, यांचे शनिवारी कीर्तन झाले. आज रविवारी
वेदांताचार्य ह.भ.प.राम महाराज डोंगर यांचे कीर्तन होणार आहे. भागवताचार्य व
रामायणाचार्य ह.भ.प.नवनाथ महाराज फुटाणे,अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष
ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले,भागवताचार्य, झी टॉकीज फेम ह.भ.प.प्रकाश महाराज
साठे,श्री क्षेत्र विठ्ठलगड पाटोदा देवस्थानचे अध्यक्ष तथा वर्ल्डबुक ऑफ रेकॉर्ड
पुरस्कार प्राप्त ह.भ.प.वैराग्यमुर्ती श्री.रामकृष्ण रंधवे (बापु)
महाराज,धर्माचार्य तथा झी टॉकीज फेम ह.भ.प.अॕड.शंकर महाराज शेवाळे यांचे अमृततुल्य
काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे.या हरिनाम सप्ताहात मोठ्या
संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प.रंधवेबापु यांनी केले.
0 टिप्पण्या