उत्तम बोडखे आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील जि.प.माध्यमिक शाळेतील ३५ वर्षापुर्वीच्या १९९० दहावी बॕच विद्यार्थीचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.सन १९९० च्या इयत्ता १० चे विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.
स्नेह मेळाव्याचे प्रारंभी गतकाळात मयत झालेले शिक्षक,विद्यार्थी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने ३५ वर्षानंतर एकत्र आल्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला.गुरु व विद्यार्थ्यांंना आपला सेवाकाळ आठवला. विद्यार्थ्यांना आपलं बालपण आठवल्याने मन हेलावून गेले. विद्यार्थी आणि शिक्षक अनेक वर्षानंतर भेटण्याचा आनंद,शब्दांना वाट मोकळी करता आली.स्नेह मेळावाचा योग वर्षातून एकदा का होईना यावा अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली.दोस्ताना चित्रपटातील
ओ खाबो के
दिन,ओ किताबो
के दिन,सवालों की राते,जवाबो के दिन,
कई साल हमने गुजारे यहाॕ
यही साथ खेले,
हुए हम जवा,
था बचपन बडा आशिकाना

हमारा....
या गीतांची आठवण माजी विद्यार्थी या नात्याने झाली.आठवणीनी सर्व विद्यार्थी,मित्र,
भारावुन गेले होते.आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील जि.प.माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९० सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि स्नेहभोजन झाले.तब्बल ३५ वर्षाने विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते.
आपण दरवर्षी क्लासमेंटांचे " गेट टुगेदर " करु या असे काकासाहेब शिंदे यांनी प्रस्ताविक भाषणात सांगीतले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जे आपल्या ग्रुपमध्ये होते.ज्यांचे निधन झाले आहे.या मित्र मैत्रीणांना आणि मयत गुरुजन यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.दहावीनंतर तब्बल ३५ वर्षाने या सर्व विद्यार्थी मित्रांची पुनर्भेट झाली.यापैकी काहीजण नियमित भेटणारे होते तर अनेकांची दहावीतुन शाळा,कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच भेट होत होती. एकमेकांना भेटून ओळख दाखवून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात सर्व मित्र हरखुन गेले होते.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले.सन १९९० ची बॅच आहे तब्बल ३५ वर्षानंतर भेट यामध्ये मुख्याध्यापक डि.जी.देशपांडे, लक्ष्मणराव नरवडे,व्हि.डी. कुलकर्णी,एस.वाय. धोंडे,निलाखे, बनकर,जगताप,मोरे हे शिक्षक उपस्थित होते मुले व मुली ८० उपस्थित होते.
0 टिप्पण्या