Ticker

6/recent/ticker-posts

' शब्दगंध ' मधून उत्तम बोडखे यांनी बंधुत्वाचे मूल्य आणि लेखणीचे सातत्य टिकवले ............ सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते ' शब्दगंध ' लेख संग्रहाचे प्रकाशन संपन्न

चौंडी (प्रतिनिधी) शब्द ही मोठी शक्ती आहे.शब्दातील ज्ञान,गुणवत्ता, क्षमता,ताकद, यातील सामर्थ्य अमूल्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे यांनी केले. दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांचा निवडक लेखसंग्रह असलेल्या 'शब्दगंध ' या लेख संग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. प्रा.राम शिंदे पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी गेल्या अनेक दशकापासून चालवलेली चिरंतन लेखणी कौतुकास्पद असून ' शब्दगंध ' या लेख संग्रहातून त्यांनी लिहलेले नावलौकीक प्राप्त व्यक्ती,साधुसंत, महंत आणि विचारवंत यांच्या जीवनावरील लेख एकत्रित करुन सामाजिक बांधिलकीचा नवा आयाम निर्माण केला आहे.या गौरवोद्गाराने उत्तम बोडखे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. बीड जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांच्या ' शब्दगंध ' या विविध व्यक्तींच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह असलेल्या ' शब्दगंध ' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी झाले. यावेळी त्यांनी लेखसंग्रहातील विविध लेखांचा धावता आढावा घेतला.जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे हे दैनिक झुंजारनेताचे गेल्या तीन दशकावून अधिक काळ वरिष्ठ पत्रकार आणि सद्यस्थितीत उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची लेखणी सकारात्मक, गुणवंतांना न्याय देणारी आणि अन्यायाला वाचा फोडणारी आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून दिवाळी अंक तसेच सामाजिक,धार्मिक शैक्षणिक आदीसह क्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. परिसरातील संत, महंत,नावलौकिक प्राप्त व्यक्तीचे चरित्र प्रकाशात आणण्यासाठी 'शब्दगंध ' सारख्या लेख संग्रहाची निर्मिती केली आहे. ' शब्दगंध ' या लेख संग्रहाचे सभापती प्रा.ना.राम शिंदे यांनी कौतुक केले आणि उत्तम बोडखे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार राजेश राऊत, फक्राबादचे सरपंच राऊत उपस्थित होते.या लेखसंग्रहात तारकेश्वरगडाचे गोपालक महंत आदिनाथशास्त्री, संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज,शंभरीपार केलेले : संत रघुनाथ महाराज धामणगांवकर, गरीब अनाथ मुलांना मायेचा ओलावा देणारे : संत मदन महाराज,एक थोर राष्ट्रसंत : भगवानबाबा, कार्यप्रवण जीवन जगणारे लेखक : प्रा.बिभीषण चाटे, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी - अशोक खेडकर,मराठी सिनेमा क्षेत्रातील एक गुणी अभिनेत्री - प्राजक्ता माळी, अविनाश साबळेंनी आष्टी जगाच्या नकाशावर आणली, निःस्वार्थ अध्यात्म सेवेला बळ देणाऱ्या - कै.संजना रामकृष्ण रंधवे, साहित्य व पत्रकारिता विश्वातील मुकुटमणी : अनंत हंबर्डे सर,गुलाबी, पांढरा,पिवळा फेटा कालबाह्य होतोय ?, कॉ.नानासाहेब पोकळे एक चळवळीतले नेतृत्व, इतिहासाचा जिवंत झरा :कै.रघुनाथराव राऊत,सुयोग्य, दमदार वाटचालीचा लाडका 'झुंजार', यशस्वी आणि आनंदी जीवनाचा प्रेरणादायी दीपस्तंभ : विक्रम पोकळे,कड्याची सुकन्या अभिनेत्री चित्रा कुलकर्णी, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले : रघुनाथ कर्डिले, मैत्री असावी तर अशी...!, ज्ञानदान करणारे आदर्श शिक्षक, प्राचार्य जे.सी.शेख,आष्टी तालुक्याच्या चालता बोलता इतिहास, शब्दसम्राट :प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे,आष्टीचे सुपुत्र हृदय रोगतज्ज्ञ डॉ.संदीप गाडे बनलेत देवदूत, स्व.मोतीरामजी वरपे दादांनी मागे ठेवला कीर्तीगंध,ग्राफीक्स क्षेत्रातील नामांकित डिझाईनर आकाश डोंगरे यांच्या जीवनावर लेख आहेत. ------------- ' शब्दगंध ' लेखसंग्रहाचे कौतुक ज्येष्ठ पत्रकार प्रफुल सहस्त्रबुद्धे, यांच्यासह आष्टी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य आणि साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर, सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ----------------- चौकट -------- पत्रकार उत्तम बोडखे यांनी निर्माण केलेला ' शब्दगंध ' लेख संग्रह अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्ता संपन्न आहे. यातील लेख हे सर्व क्षेत्राला स्पर्श करणारे आहेत. विशेषत्वाने..आदर्शवादी,आणि अध्यात्मिक विचाराला चालना देणारे असून त्यातून समता,बंधुत्व आणि ऐक्य या मुल्यांची निर्मिती होते.. --- भीमराव धोंडे, शिक्षण महर्षी, पूर्व विधानसभा सदस्य, आष्टी/पाटोदा/शिरूर (का) ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या