
आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील लोकांनी शासकीय गायरान जमिनीवरील शेतीसाठी केलेली अतिक्रमण नियमित करावेत ही आमची मागणी असताना ती पुर्ण होण्याऐवजी या गायरान जमीनीवर मुख्यमंत्री सौरउर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे अनेक दिवसांपासुन अतिक्रमण धारकांचे आंदोलन सुरु आहे. प्रशासन त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करुन त्यांना बेदखल करु पाहत आहेत. अंबाजोगाईचे तहसिलदारांची चौकशी करुन त्यांना तात्काळ निलंबन करावे व त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी. जिल्ह्यातील मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पांचे सर्व कामे थांबवावेत अन्यथा आम्ही ते कामे बंद पाडणार आहोत. तसेच लवकरच कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बीड येथे घेणार असल्याची माहिती डाॕ. बाबासाहेब आंंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा आष्टी पंचायत समितीचे सदस्य यशवंत खंडागळे यांनी पत्रकारांना दिली.
बीड येथे लवकरच सर्व आंबेडकरी विचारांच्या जेष्ठ व युवक कार्यकर्त्यांना एकत्रित करुन जिल्ह्यात राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौरउर्जा प्रकल्प ही दलित,आदिवासी, भटके विमुक्त लोकांवर कसा अन्याय करणारा आहे. हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना आ.सुरेश धस यांच्या माध्यमातून भेटुन व जिल्ह्यातील या आमच्या रास्त व न्याया मागणीस जे जे पाठींबा देणारे लोकप्रतिधी यांच्या सहकार्याने आलेले संकट थांबविण्याचे प्रयत्न करणार आहोत.लवकरच बीड येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करुन आंबेडकरी विचार मंच स्थापन करणिर आहोत.या बैठकीस जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन गायरान वाचविण्याचे काम करावे असेही यशवंत खंडागळे यांनी आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या