Ticker

6/recent/ticker-posts

दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची गाठ घट्ट बसते ........ समाजभुषण उत्तमराव तरकसे

आष्टी (प्रतिनिधी) मुंबई चेंबूर येथील मॅक्स महाराष्ट्र मीडियाच्या छायाचित्रण गृहात मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती, माणुसकी फाउंडेशन व मॅक्स महाराष्ट्र मीडियाच्या वतीने मुंबई चेंबूर येथील मॅक्स महाराष्ट्र यांचे छायाचित्रण ग्रहामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी. जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास निमंत्रित प्रमुख अतिथी म्हणून समाजभूषण उत्तमराव तरकसे आसरढोकर (महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत) हे उपस्थित होते.तरकसे यांना या कार्यक्रमात मैत्री,माणुसकी फाउंडेशन व मॅक्स महाराष्ट्र मीडिया या संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रप्रेरणा पुरस्कार २०२५ चा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले असता र्कत्यगनता म्हणून उत्तमराव तरकसे यांनी या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत सध्याच्या कौटुंबिक कलाहाची मोठी समस्या समाजापुढे उभी असल्याने त्यावर विचार मांडत "कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओठावी लागते" तेव्हाच गाठ घट्ट बसते असेच नात्याचे आहे. "दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची गाठ घट्ट बसते"असे समाज प्रबोधनात्मक विचार मांडले, या कार्यक्रमाच्या विचार मंचावर आनंद गायकवाड (मॅक्स महाराष्ट्राचे उपसंपादक) सुरज भोईर (सामाजिक कार्यकर्ते) सौ राहाराव ईदू (आदर्श शिक्षिका) मा मोहन जाधव (साहित्यिक) संतोष आंबेकर (राजकीय विश्लेषक) राजेश जाधव (मुक्त पत्रकार ) सौ मनीषा मांढरे (सामाजिक कार्यकर्ते) संतोष खरडमोल (कवी) आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता राजेश जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या