भारतीय हिंदु संस्कृतीचा विचार करता विविध सणांची सुरेल गुंफण आपल्या डोळ्यांसमोर
उभी रहते. आपल्या सर्व सणांना पुर्वपार चालता असलेल्या प्रथा, परंपरांची आणि साधर्म
विचारांची जोड असल्याचे दिसुन येते.या सणामध्ये निसर्ग,दिनक्रम,आहाराला महत्त्व
आहे.भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणवार, उत्सव,यात्रा,जत्रांना विशेष स्थान व
महत्त्व आहे.आपल्या आयुष्यात प्रत्येक सण उत्सव महत्त्वाची जबाबदारी पार
पाडतात.प्रत्येक साण,उत्सव ,यात्रा आपल्याला काहीतरी सांगतो.ज्येष्ठ महिन्यातील
पानगळ आणि चैत्र महिन्याची पानफुटी यांचा एकत्रीत धागा गुंफणारी " अक्षय तृतीया "
येते. अक्षयतृतीया नंतर येणाऱ्या गुरवारी सराटेवडगांवचा जानपीराचा यात्रा उत्सव
ठरलेलाच असतो.यावर्षी ही यात्रा आज गुरुवार दि.१ मे आणि शुक्रवार दि.२ मे २०२५ अशी
दोन दिवस होत आहे. अक्षयतृतीया नंतर नवचैतन्य , मांगल्य फुलवुन दिमखात डौलात हिंदु
नववर्षाला प्रारंभ होतो.प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशाआकांक्षा पल्लवीत करणारा
अक्षयतृतीयाचा सण असतो.आदर्शगाव सराटेवडगांव - आनंदवाडी गावचे ग्रामदैवत असणारे
हिंदु - मुस्लीमांचे श्रध्दास्थान असणा-या जानपीर देवस्थानचा आज यात्रा उत्सव पार
पडतो आहे.१५ दिवसापुर्वीच सराटेवडगांव ग्रामस्थांचे दैवत असलेल्या मळगंगामातेचा
यात्रा उत्सवही थाटात पार पडला आहे.मळगंगा मातेच्या यात्रेनिमित्त छबीना,काठी
मिरवणुक,भंडारा पुजा झाली.रात्री शोभेच्या दारुची अतिषबाजी करण्यात आली. आष्टी
तालुक्यातील सराटेवडगांव हे गांव सर्वपरिचीत आहे.येथे मळगंगामाता व जानपीर हे दोन
ग्रामदैवत आहेत.हिंदु व मुस्लीम दोन्ही समाज एकोप्याने दोन्ही यात्रा साजरी
करतात.अखंडतेचे व एकात्मिकतेचे दर्शन घडाविणारे हे एकमेव आदर्शगाव आहे.दोन्ही
गावांचा विकास झपाट्याने होत आहे. युवक व महिला पुरुष ग्रामस्थ एकजुटीने
ग्रामोध्दारासाठी प्रयत्नशील असतात.दोन्ही गावातील पाणीपुरवठ्याच्या जलजीवनचे
सुमारे दिड कोटी रुपयाचे कामे झाली आहेत.येथे हिंदु - मुस्लीम बांधव एकत्रीत येऊन
दोन्ही यात्रा उत्सव पार पाडतात.ख-या अर्थाने सराटेवडगांवात राष्ट्रीय एकात्मता
जोपासली जाते. मळगंगा मातेची यात्रा शाकाहारी असते तर जानपीरची यात्रा मांसाहारी
असते.सुंबरे पाटील पुजारी असणारे मळगंगामाता देवस्थान जागृत देवस्थान आहे.या मंदिर
परिसरात सभामंडप,कंपाऊंड ही कामे झालेले आहेत.माजी आ.बाळासाहेब आजबे यांची सासरवाडी
असलेल्या या गावातील या मंदीर विकासासाठी भरपुर निधी मिळाला आहे.माजी आमदार
सौभाग्यवती सौ.सविताताई बाळासाहेब आजबे यांचे माहेरच्या ग्रामदैवत विकासासाठी भरीव
मदत दिली आहे.आष्टी तालुक्यातील मेहकरी लाभक्षेत्रात येणारे सराटेवडगांव -आनंदवाडी
हे गाव आहे.बागईतदार गाव आहे.संपन्नता असलेला हा परिसर आहे.माजी आ.भीमराव
धोंडे,आ.सुरेश धस,माजी आ. बाळासाहेब आजबे,माजी आ. साहेबराव दरेकर,बलभीम सुंबरे
पाटील यांंच्या प्रयत्नाने कुकडीचे पाणी मेहकरीत आले आहे.दरवर्षी कुकडीच्या
पाण्याने हे धरण भरुन घेतले जात आहे. कडा शहरापासुन ९ कि.मि.अंतरावर असणारे
सराटेवडगांव हे गांव. महाराष्ट्राच्या नकाशावर आलेले हे आदर्शगाव आहे.नौकरदार,
पगारदार,व्यावसायिक,उद्योग व्यापार क्षेत्रात आघाडीवर असलेले हे गाव.प्राचार्य,
प्राध्यापक, पोलीस,पत्रकार, वकील,डाॕक्टर,इंजिनिअर, भारतीय सेनेत सैनिक याशिवाय
शिक्षकांची उल्लेखनीय संख्या आहे.सर्व क्षेत्रात काम करणारे लोक येथे
आहेत.सराटेवडगांवची जानपीराची यात्रा सर्वपरिचीत आहे.येथील देवस्थानचे दर्शनासाठी
टाकळी आमिया, मेहकरी,रुईनालकोल,नांदा, फत्तेवडगांव,शिरापूर, पिंपळगाव दाणी,पिंपरी
घुमरी या गावातील ग्रामस्थ येतात.हिंदु - मुस्लीमांचे एकतेचे प्रतिक असणारा हा
अव्दितीय भक्ती उत्सव आहे.सर्वधर्म समभाव हे ब्रिदवाक्य ख-या अर्थाने येथील
ग्रामस्थ पाळतात.सराटेवडगांव -आनंदवाडी गावातुन बाहेरगावी नौकरी व्यावसायाच्या
निमित्ताने गेलेले सर्व लोक या यात्रेसाठी हमखास येतातच.दर्शनाबरोबर आपले
मित्र,नातेवाईक व लहानपणीचे सवंगडी यांचे स्नेहमिलन यात्रेनिमित्त होत असते.आष्टी
तालुक्यातील आदर्शगाव सराटेवडगांव येथे आज गुरुवार दि.१ मे आणि शुक्रवार दि.२ मे
२०२५ असा दोन दिवसांचा जानपीर देवस्थानचा याञा उत्सव सुरु आहे.दोन दिवस चालणाऱ्या
यात्रेत आज संदल छबीना मिरवणुक,शुक्रवारी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे.या
यात्रेस पुणे,सुरत,छत्रपती संभाजीनगर, मुंबई,ठाणे,बीड कल्याण,अहिल्या नगर येथील
भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.ग्रामस्थांनी जानपीर यात्रा महोत्सव दोन
दिवस आहे.संदल,छबीना, सांस्कृतिक कार्यक्रम , कुस्तीगिरांसाठी जंगी हंगामा होणार
आहे.सराटेवडगांव येथील जानपीर देवस्थान यात्रेनिमित्त दि.१ आणि २ मे असा दोन दिवस
याञा उत्सव संपन्न होत आहे.छबीना मिरवणुक राञी सांस्कृतिक व मनोरंजनाचा कार्यक्रम
होणार असुन शोभेच्या दारुची अतिषबाजी करण्यात येणार आहे.सकाळी आर्केस्टाचा हजे-याचा
कार्यक्रम होणार आहे.यामध्ये मराठी परंपरा जोपासणारा गीतांचा मराठी,हिंदी
लोकगीते,लावणी सोबत वेस्टर्न नृत्याविष्कार असा कार्यक्रम होणार आहे.उद्या
शुक्रवारी सायंकाळी ४ ते ७ यावेळात जंगी कुस्त्यांचा हंगामा होणार आहे. कुस्तीच्या
जंगी हंगाम्यात नामांकीत मल्लाच्या कुस्त्या होणार आहेत.ग्रामदैवत जानपीरबाबा
यात्रेनिमित्त गुरुवारी सायंकाळी संदल मिरवणूक सोहळा होणार असुन प्रमुख आकर्षण
आंबीजळगाव येथील न्यू. अलंकार बॅन्जो ग्रुप,संबळ पथक,शोभेची दारूची आतीषबाजी तर
शुक्रवारी सकाळी ९ ते ११ हजेरी कार्यक्रम व शुक्रवारी रात्री ९ ते १२ यावेळात "
बेधुंद अप्सरा " हा आॕर्केस्टा कार्यक्रम होणार आहे.ऐक्य,अन् बंधुत्वाचे प्रतीक
जानपीरबाबा यात्रेत सर्वधर्मसम भावाचे दर्शन! घडते.हा यात्रा उत्सव शांततेत व
यशस्वीपणे पार पडण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच भीमराव बोडखे, उपसरपंच लहु तरटे,सर्व
ग्रा.पं. सदस्य,माजी सरपंच,सेवा सोसायटीचे चेअरमन बबन नन्नवरे,व्हाईस चेअरमन
कोंडीराम झांबरे,सर्व संचालक मंडळ,ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
ग्रामदैवत जानपीर यात्रा उत्सवानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक
शुभेच्छा
.... ----------------
चौकट
-----------
जानपीर देवस्थानाबाबतची अख्यायिका
अशी आहे की,बीड- अंमळनेर मार्गावरील डोंगरकिन्ही या गावापासून ८
कि.मी.अंतरावर.असणाऱ्या येवलवाडी येथील मुख्य जानपीर देवस्थान दर्शनासाठी आनंदवाडी
येथील झांबरे कुटुंबातील एक अनामिक भक्त दर गुरुवारी पायी जात असे. वर्षानुवर्षे
त्याचा हा परिपाठ होता.पुढे त्याला वार्धक्य आले. हा भक्त थकला तरी त्याने हा नियम
तोडला नाही.या भक्तावर जानपीरबाबा प्रसन्न झाले.सराटेवडगाव हे गाव अर्धा
कि.मी.अंतरावर राहिले असताना या अनामिक भक्ताने खरच जानपीरबाबा आले आहेत की नाही
याची खात्री करून घेण्यासाठी मागे वळून पाहिले. जेथे पाहिले त्याचवेळी एका माळावर
जानपीरबाबा थांबले.हेच ते स्थळ आहे. जानपीरबाबा येथील देवस्थानला गुळ,नारळ,शेरणी,
मलिदा असा शाकाहरी प्रसाद वाटप केला जातो. मात्र दैत्यासाठी पशुहत्येची आजही परंपरा
आहे.


------------------
लेखक -- उत्तम बोडखे,
(उपसंपादक)
-------------------
0 टिप्पण्या