Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी शहरात महामानवाला सकाळी अभिवादन ; रात्री भव्य दिव्य मिरवणूक ........... आष्टीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह,भव्य मिरवणूकीने आष्टीकरांचे वेधले लक्ष...

आष्टी (प्रतिनिधी) भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आष्टी शहरात आणि तालुकाभरात उत्साह दिसून आला.डाॕ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यासाठी दिवसभर रांगा होत्या." विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,जय भीम,जय भीम " यासाररख्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला.सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून -उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली होती परंतु भीम जयंतीचा उत्साह दुपारपर्यंत कायम होता. सायंकाळच्या सुमारास आष्टी शहरातून मिरवणुक निघाली.आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन भव्यदिव्य डिजेसह मिरवणूक झाली. भीमनगरातील संकल्प बुध्द मंदीर आवारात आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे, तहसिलदार वैशाली पाटील,सतीषआबा शिंदे,अशोक साळवे, वाल्मिक निकाळजे, नगराध्यक्ष जिया बेग यांच्या हस्ते आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी निलध्वजारोहन आ.सुरेश धस यांच्या हस्ते झाले तर डाॕ. आंबेडकर उद्यानात निलध्वजारोहन माजी.आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते झाले. अनिल भैय्या नगरात निलध्वजारोहन भाजपचे अनुजाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.वाल्मिकतात्या निकाळजे यांच्या हस्ते झाले. यावेळी राजेंद्र धोंडे, यशभैय्या आजबे, माजी सभापती ॲड.साहेबराव म्हस्के,कवी प्रा. सय्यद आल्लाउद्दीन, पत्रकार उत्तम बोडखे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अनिलभैय्या नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने जेष्ठ पत्रकार स्तंभलेखक उत्तम बोडखे यांचा ॲड. वाल्मिकतात्या निकाळजे,कवी प्रा. सय्यद आल्लाउद्दीन व ॲड.रत्नदीप निकाळजे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आष्टी येथील भीमनगरात अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम ९:३० वाजता सुरू झाला.भत्ते यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.डाॕ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक महोत्सव समितीचे अध्यक्ष सरपंच परिवंत गायकवाड, पदाधिकारी व भीमसैनिकांचे देखणृ नियोजन आयोजन होते.आष्टी मतदार संघातील सर्व आजी - माजी आमदार,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावर्षी वामनराव निकाळजे यांचे नेतृत्वाखाली समता दलाच्या वतीने बुध्दवंदना झाली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सरपंच परिवंत गायकवाड, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, अशोक साळवे, सतिषआबा शिंदे, ॲड.वाल्मिकतात्या निकाळजे, नगराध्यक्ष जिया बेग,अरुणभैय्या निकाळजे,समितीचे उपाध्यक्ष अरुण कांबळे,सीताराम घोडके,ॲड.रत्नदीप निकाळजे,किशोर हंबर्डे,रंगनाथ धोंडे, संजयशेठ मेहेर,डाॕ. मधुकर हंबर्डे, संतोषशेठ मेहेर, नियामत बेग, बद्रीनाथ जगताप, डाॕ.विलासराव सोनवणे,आदिनाथ सानप,भाऊसाहेब लटपटे,जालींदर वांढरे,सुनिल मेहेर, रामशेठ मधुरकर, यशवंत खंडागळे, सादीक कुरेशी,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,सचिन रानडे, प्रवीण पोकळे, आण्णा साबळे, खंडुदादा जाधव, महेश सावंत,भारत मुरकुटे,डाॕ.वाय.डी. बन्सोडे प्राचार्य नागसेन कांबळे, वामन निकाळजे, किशोर निकाळजे, बाळासाहेब बोरुडे, डाॕ.नदीम शेख,सौ. सरस्वती जाधव, प्राचार्या सिमा कांबळे,घोडकेताई,कडा कृ.उ.बा. समितीच्या संचालिका सौ. वंदना गायकवाड, प्रा.कृष्णा सोनवणे,सुनिल शिंदे सर,सेवानिवृत गटविकास अधिकारी बबनराव खंडागळे,ॲड. सतीष गायकवाड, रुपेश निकाळजे, सुरेश निकाळजे, संजय वखरे, रमेश भोगाडे,प्रा. महेश चवरे अदि मान्यवरांची उपस्थिती होती. त्यानंतर भंतेजी धम्मशील थेरो यांनी त्रिसरण,पंचशील, आशीर्वचन दिले. पुढे समता सैनिक, माजी सैनिक यांच्या शाक्य संघाने संयुक्तरीत्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सलामी दिली. चौकट -------- गुणवंतांचा महोत्सव समितीच्या वतीने सत्कार ------------ रितेश नवनाथ लोंढे, नंदीनी नागसेन कांबळे,योगेश सोमीनाथ माने, संकेत आबा सदाफुले,प्रद्युम्न मोहन डाळिंबकर यांचा स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्याबद्दल तसेच हस्ताक्षर तज्ञ अनिल बेद्रे यांनी जयंती स्थळी उत्कृष्ट रांगोळी साकारल्याबद्दल डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक महोत्सव समितीचे वतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकारा सचिन रानडे यांनी वाढदिवसानिमित्त भीमनगर जि.प.प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय सहित्य व वह्य पेन वाटप केले. यावेळी आष्टी तालुक्यातील सावरगाव घाटचे सरपंच पंढरीनाथ चंदनशिव यांना कालकथीत रघुनाथ निकाळजे (बंधु) स्मृती पुरस्कार प्रदान आला. ------------- चौकट -------- आष्टीत या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि व्याख्यानांचे आयोजन केले होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सोहळ्याच्या निमित्ताने भीम गीतांचाही दर्जेदार कार्यक्रम झाला. यावेळी आ.सुरेश धस यंची विशेष उपस्थिती लाभली होती.महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सपनाताई खरात यांच्या गर्दी खेचणा-या भीमगीतांच्या कार्यक्रमाने आष्टीकरांची मने जिंकली होती.सात दिवस व्याख्याने व विविध कार्यक्रम झाले.यंदा भीम संदेश पर्व २०२५ ह विशेष कार्यक्रम महोत्सव समितीचे अध्यक्ष परिवंत गायकवाड यांच्या संकल्पनेतुन घेण्यात आला. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या