Ticker

6/recent/ticker-posts

संत वामनभाऊंच्या नारळी सप्ताहात 'विणेकरी' होण्याचे भाग्य येते तेंव्हा..!

आष्टी (प्रतिनिधी‌) समता, बंधुत्व, एकता आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देत आयुष्यभर ही मूल्ये जपून पेरणी करणारे थोर वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहामध्ये भाऊंच्या दर्शनासाठी गेले असताना ज्येष्ठ नागरिकांनी आग्रहाने दिलेला गळ्यातील विना हा भाग्याचा क्षण असल्याची भावना शिक्षक बांधवांनी व्यक्त केली आहे. दैवी शक्ती लाभलेले अध्यात्मिक महापुरुष अशी ज्यांची ख्याती आहे आणि ज्यांनी शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा मंत्र दिला.. असे थोर संत वामनभाऊ महाराजांचा नारळी सप्ताह बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे किर्तन प्रवचन आदींसह आध्यात्मिक उपक्रमांनी संपन्न होत आहे. आज मंगळवारी दुपारी येथील शिक्षण क्षेत्रामधील अध्यापकांनी सप्ताह मंडपातील संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.यावेळी विणेकरी ज्येष्ठ भक्त भागवत जयवंता सानप यांनी प्रा. बिभिषण चाटे सर यांच्या गळ्यात आग्रहपुर्वक वीना दिला. तो सरांनी अत्यंत आनंदी आणि पवित्र मनाने स्वीकारत आध्यात्मिक आनंद घेतला. हा दिलेला विना हा माझ्यासाठी 'भाग्याचा क्षण' असून संत वामनभाऊ महाराजांच्या कार्याचा पवित्र सुगंध घेताना मनस्वी समाधान वाटते! अशी भावनिक प्रतिक्रिया प्रा. बिभिषण चाटे यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ भाविक भागवत जयवंता सानप, आश्रुबा निवृत्ती खेडकर, महादेव दादा गुंजकर, प्राचार्य एस.सी.वारभुवन, प्रा.बी.के. मुंडे, डी एस तळेकर, धर्मराज सांगळे,जी.एम.बांगर, एस.ई. ढाकणे,सी.एम.शिरसाट आदी सह उपस्थित होते. यावेळी अध्यापकांनी श्रीक्षेत्र गहीनाथ गडाचे मठाधिपती महंत ह‌.भ.प.विठ्ठल महाराज यांचे दर्शन घेतले. ---------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या