
आष्टी (प्रतिनिधी)
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आष्टी येथील अनिलभैय्या नगर भागामध्ये अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात स्तंभ लेखक तथा दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांचा मान्यवरांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला.विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आष्टी येथील जेष्ठ पत्रकार तथा स्तंभलेखक उत्तम बोडखे यांचे आजपर्यंतचे कार्य कौतुकास्पद असून राजकीय,सामाजिक, धार्मिक, वैचारिक आदि क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे आहे.त्याची दखल घेत या वैविध्यपूर्ण स्तंभालेखनाबद्दल आष्टी येथील अनिलभैय्या नगरामध्ये संपन्न झालेल्या भीमजयंती कार्यक्रमात भाजप अनुसूचित जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.वाल्मीकतात्या निकाळजे,सुप्रसिद्ध कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, विधीज्ञ रत्नदीप निकाळजे आदि सह मान्यवरांच्या हस्ते उत्तम बोडखे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.दरम्यान उत्तम बोडखे यांनी आजपर्यंतच्या कारकीर्दीत पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले असे सांगून बोडखे यांचे सातत्यपूर्ण लिखाण आष्टीकरांना योग्य दिशा देणारे आहे अशा शब्दात भाजप अनुसूचित जातीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.वाल्मीकतात्या निकाळजे यांनी त्यांचा गौरव केला.प्रसिद्ध कवी सय्यद अल्लाउद्दीन यांनी उत्तम बोडखे यांची पत्रकारिता सकारात्मक असून गुणवंतांना न्याय देण्याचे काम करते असे सांगितले.ॲड. रत्नदीप निकाळजे यांनी उत्तम बोडखे यांचा लेखणी सम्राट असा उल्लेख केला.या भीम जयंती उत्सव कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजकीय, सामाजिक,धार्मिक,वैचारिक, शैक्षणिक आदिसह पत्रकारिता क्षेत्रातील बांधव,भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या