
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र कासारी येथे संत शिवस्वरूप बन
महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
हा सप्ताह दि.१९ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत होत असुन त्यामध्ये ग्रंथराज
ज्ञानेश्वरी पारायण,श्रीराम नामजप व अखंड हरिनाम सोहळा होणार आहे.या सप्ताहात
ह.भ.प. परसराम बन महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम नाम जप होणार आहे.सर्व भाविक
भक्तांनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह आयोजन समितीने केले आहे. दि.१९
एप्रिल रोजी ह.भ.प. शिवचरित्रकार राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदी), दि.२० एप्रिल
रोजी भागवताचार्य ह.भ.प.कुशल महाराज पुरी (परभणी),दि.२१ एप्रिल रोजी झी टाॕकीज फेम
विनोदाचार्य ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पन्हाळकर (कांबी),दि.२२ एप्रिल रोजी ह.भ.प.
माऊली महाराज धायगुडे शास्त्री (भगवानगड),दि.२३ एप्रिल रोजी ह.भ.प. विष्णु महाराज
अंतरकर (गेवराई), दि.२४ एप्रिल रोजी विनोदाचार्य ह.भ.प. माऊली महाराज (खडकवाडीकर),
दि.२५ एप्रिल रोजी विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा) यांचे हरि
कीर्तन होणार आहेत.गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी रात्री ११ ते १ यावेळात भारुड सम्राट
ह.भ.प.सावता केशव फुले महाराज (बारामती) यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.दि.२५
एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. दिंडी प्रदक्षिणा व पादुका मिरवणुक होईल.रात्री १२ वा.
शिवस्वरुप बन महाराज संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी होणार आहे.या सप्ताहात व्यासपीठ
चालक म्हणून ह.भ.प.शरद महाराज आहेर (आळंदी) हे काम पाहत आहेत. शनिवार दि.२६ एप्रिल
रोजी सकाळी १० ते १२ याळेत ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री (आळंदी) यांचे
काल्याचे कीर्तन होणार आहे.त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. सप्ताहात
ह.भ.प. संगीत विशारद ज्ञानेश्वर महाराज औटे,संगीत विशारद ह.भ.प.इंद्रजीत महाराज
येवले, मृदंग सम्राट मोहन महाराज घुले,मृदंग सम्राट प्रथमेश महाराज शिंदे यांची साथ
संगत लाभणार आहे.यावेळी आ. सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे , माजी आ.साहेबराव
दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे, देविदास धस, सतिषआबा शिंदे यांच्यासह
राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिसरातील भावीक
भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संत शिवस्वरुप बन महाराज सप्ताह
समिती,तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी केले आहे.
"
0 टिप्पण्या