Ticker

6/recent/ticker-posts

सुसंस्कारी पिढी घडविण्यासाठी शेरी बु.येथे अध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबीराचे आयोजन ........ ह.भ.प.निळकंठ महाराज

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्था आयोजित आष्टी तालुक्यातील शेरी बु.येथे २८ एप्रिल ते १० मे २०२५ या कालावधीत अध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबीर होणार असल्याची माहिती भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांनी दिली. अखंड १५ वर्ष ही संस्था अध्यात्मिक वारकरी बालसंस्कार भव्य शिबिर व किर्तन सोहळा आयोजित करते.चंदनगिरीबाबा सभागृह शेरी बु. येथे श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. भागवताचार्य नीळकंठ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर होणार आहे.या शिबिरात मृदंग, तबला,हार्मोनियम,गायन,वारकरी चाली,हरीपाठ,
प्रारंभिक वारकरी शिक्षण,योगासने, हनुमान चालीसा, पांडुरंग अष्टक, श्रीमद्भगवद्गीता, नववा,बारावा,पंधरावा वा. अध्याय, व विष्णुसहस्त्रनाम, संत चरित्र,प्रवचन व कीर्तन, व्याख्यान, जीवन जगण्यासाठी आवश्यक गुण आदी विविध विषय शिकविले जाणार आहेत.या शिबीरामुळे उन्हाळ्यातील सुट्टीचा सदुपयोग होतो.संस्कार मिळतात,जीवन निर्व्यसनी कसे जगावे? जीवनात आईवडीलांचे काय महत्त्व आहे? समाजात कसं वागावं बोलावं राहावं?, हे सर्व मार्गदर्शन मिळणार आहे. वयाची अट इयत्ता तिसरी ते बारावीचे सर्व मुले व मुली,कोणत्याही वयातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात,आवश्यक ती फि भरावी लागेल.१३ दिवस शिबिरातच राहावे लागेल नियम बाह्य पद्धतीने वागल्यास शिबीरातुन काढण्यात येईल. येताना शाल सतरंजी आवश्यक कपडे पखवाज पेटी ताट वाटी ग्लास व रोज लागणारे साहित्य,विद्यार्थी संख्या मर्यादित असल्याने लवकरच नावनोंदणी करण्यासाठी या 8552856171, 9309885482 या नंबर फोन करून त्यांच्याशी सहभागी व्हावे.ज्यांना अन्नदान करायचे असेल त्यांनी 8552856171 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांनी केले.शिबाराचा समरोप श्रीमद् भागवत महापुराण कथेने होणार आहे. कथा प्रवक्ते ह.भ.प. भागवताचार्य नीळकंठ महाराज तावरे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या