Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील चव्हाण आणि सौभाग्यवती कंचन चव्हाण यांच्या संकल्पनेतून टेनिस झेंडू फुलांचा यशस्वी प्रयोग! .......... दोन एकर क्षेत्रात फुल शेती; चार लाख रुपयाचे उत्पन्न

उत्तम बोडखे,आष्टी. ---------------- आपले अख्खे आयुष्य उच्चपदस्थ अधिकारी म्हणून मोठ्या शहर आणि महानगरामध्ये घालवल्यानंतरही स्वतःच्या मनात शेतीविषयी असलेले प्रेम अखेर सेवानिवृत्ती नंतर मात्र कामाला आले आणि आष्टी तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका छोट्या खेड्यात दोन एकरामध्ये विविध फुलांच्या शेतीचा प्रयोग करून माजी सनदी अधिकाऱ्यांनी कृषी प्रेम कृतीतून दाखवून दिले आहे.महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सेवानिवृत्त मुख्य सचिव तथा सेवानिवृत्त जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांनी आपली यशस्वी कार्यकिर्द निभावली.गेल्या काही दिवसात ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या मायभूमीकडे आणि विशेषतः त्यांनी शेतीमध्ये स्वतः लक्ष देत फुल शेतीचा प्रयोग हाती घेतला.विशेष म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती कंचन सुनील चव्हाण यांना टेनिस झेंडू फुलांच्या शेतीचा छंद आहे. शहरात राहूनसुद्धा ग्रामीण समुह जीवन आणि शेतीमध्ये टेनिस झेंडू फुलांच्या शेती करून आनंद घेण्याचा त्यांचा एक वेगळा छंद आहे.तो त्यांनी अर्थातच पतीदेवांच्या पाठबळावर आर्थिक स्त्रोत निर्माण करत आणि कृषी क्षेत्राविषयी आवडी संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे. आष्टीपासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या कासारीजवळ दोन एकर शेतीमध्ये त्यांनी टेनिस झेंडू फुलांची लागवड केली. ठिबक सिंचनने पाणी, औषध आणि फवारणी नियोजन करून तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या संवादासमवेत फुल शेती यशस्वी करत टेनिस झेंडू फुलांचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. यासाठी त्यांनी देवी निमगाव येथील एक शेतकरी कामगार जोडपे शेतात काम करण्यासाठी मदतीस घेतले.आज मोठमोठे सुगंधी टेनिस झेंडूची फुले शेतामध्ये लगडली असून पाहणाऱ्यांनीही गर्दी केली आहे. चौकट -------- सामूहिक गट शेती करण्याची गरज! ----------------- या टेनिस झेंडू फुलांच्या शेतीमध्ये या प्रतिनिधींनी सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेतली असता शेतीच्या यशस्वी आर्थिक स्त्रोत वाढीच्या अनुषंगाने चर्चा केली.तेव्हा फुलशेती ही सामुहिक गट शेती करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन सुनिल चव्हाण यांनी केले.सरकारी अस्था,प्रचंड कष्ट आणि नियोजन केल्यास शेती परवडू शकेल असा विश्वास त्यांनी दिला. -------------------- सौभाग्यवती कांचन यांचा छंद; आणि पती यांचे पाठवळ! ---------------------------
माजी उच्च पदस्थ अधिकारी सुनील चव्हाण यांच्या सौभाग्यवती कंचन यांना टेनिस फुलांच्या शेतीचा छंद आहे. या छंदाला पती सुनील चव्हाण यांनी कृतीतून पाठबळ दिले. आणि तालुक्यापासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या दोन एकर शेतीमध्ये टेनिस झेंडूच्या फुलांचा यशस्वी प्रयोग केला. आज या शेतीत मोठे सुगंधी फुले लगडली असून पती-पत्नीची जोडी कामगारांच्या सोबत कष्टातून आनंद घेण्याचा मनस्वी प्रयत्न करताना दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या