Ticker

6/recent/ticker-posts

ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापु यांच्यामुळे आज विठ्ठलगडावर भक्तीचा सुगंध दरवळला...

पाटोदा ( प्रतिनिधी ) आपला उद्योग व्यवसाय शेती करून काबाड कष्टातून जी आर्थिक प्राप्ती केली.अध्यात्म सेवेसाठी रामकृष्ण रंधवे बापु अर्पण करतात.संत तुकारामांच्या कार्याची दखल घेत नुसते बोलके नव्हे;किंबहुना कृतीतून कार्य दाखवणारे ह.भ.प.रंधवेबापू आदर्शवत कीर्तनकार आहेत.आम्ही अभ्यासु कीर्तनकार कुणाच्याही पायावर डोके ठेवत नाहीत, रंधवे बापुसारख्या वैराग्यमुर्ती त्यागी व्यक्तीमत्वाच्या पायावर डोके ठेवत असतो.ह.भ.प. रंधवेबापू यांनी आपली सत्कार्याची दिशा कायम ठेवली.अशा या खऱ्याखुऱ्या संत सज्जनांच्या साहित्याची जशास तसे पेरणी सद्यस्थितीतील समाजामध्ये करून गोरगरीब,दीनदलित, दुबळ्या,अनाथ, अपंग, शेतमजूर, शेतकरी,वंचित घटकांना मानवी जीवनाचे खरे सुख अध्यात्मात असल्याचे हजारो कीर्तन सेवेतून समाजप्रबोधन ते करीत आहेत. रंधवे बापु यांचे व्यक्तित्व आणि आसामान्य कार्य,अमोघवाणी, पहाडी आवाज,सेवा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी, सुख शांती आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने उपयोगाची आहे.आज त्यांच्यामुळे " विठ्ठलगड " भक्तीत न्हाऊन निघाला आहे. ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापु यांच्यामुळे आज विठ्ठलगडावर भक्तीचा सुगंध दरवळला असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांनी केले. पाटोदा येथील विठ्ठलगड येथे ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,सौ.प्राजक्ताताई धस, नगराध्यक्ष राजु जाधव, संजय कांकारिया,माजी सभापती अनिल जायभाये,ॲड.रत्नदीप निकाळजे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पैलवान बाळु आवारे, अंकुश मुंडे, हनुमान येवले, राजेंद्र लोखंडे महाराज बाबासाहेब शिंदे आदि सामाजिक,राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. टाळ, मृदंग आणि विना यांच्या सुगम अत्यंत पवित्र आवाजातून मधुर लयबद्ध सूर ताल आणि संगीतमय वातावरणात विठ्ठलगडावरील वातावरण भक्तीच्या आनंदात नाहून निघाले! संत सज्जनांच्या विचार कार्य आणि उपस्थितीने गड अक्षरशः भक्ती आणि निष्ठेच्या कृपा आणि भाविकांच्या स्नेहाने अक्षरशः सुगंधित झाला! बीड जिल्ह्याच्या पाटोदा येथे विठ्ठलगडाची निर्मिती जागतिक कीर्तीचे जेष्ठ कीर्तनकार समाज प्रबोधनकार ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू यांच्या आर्थिक परिश्रमातून झालेली आहे. दरम्यान त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मौलिक विचारांना घेऊन महाराष्ट्रातील थोर विचारवंत असलेल्या कीर्तनकारांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज झाली.अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे किर्तन आज रामायणाचार्य ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांचे झाले. चौकट -------- विठ्ठलगड भक्तीरसात चिंब! ------------------- संत तुकाराम,संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई,संत सावतामाळी, संत वामनभाऊ, संत भगवानबाबा,संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्यासह महाराष्ट्रातील असंख्य प्रभावशाली संत सज्जनांच्या विचारांना भाविकापर्यंत पोहोचवण्याची किमया अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व कीर्तनकारांनी लिलया पार पाडली. कीर्तनकारांनी भाविक भक्तांना आध्यात्मिक विचारांची देणगी दिली.आज झालेल्या सांगता सोहळ्यात वैचारिक विचारांची झालेली देवाण-घेवाण यामुळे अवघा " विठ्ठलगड " भक्तीरसात ओलाचिंब झाला!' अशा सद्गदित भावना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी व्यक्त केली. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या