आष्टी (प्रतिनिधी)
हजची पवित्र यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कडा कृषी
उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांचा आष्टी तालुका पत्रकार
संघाच्यावतीने कडा येथे चंद्रमा अॕटोमोबाईल्स येथे सत्कार करण्यात आला.प्रत्येक
मुस्लीमने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुराणामध्ये आदेश आहे.ही एक
पवित्र यात्रा समजली जाते. त्यामुळे जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक
मुस्लीमची इच्छा असते.हज यात्रेवरून नुकतेच कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
रमजान तांबोळी व त्यांचे बंधू परतले आहेत. त्यांना आष्टी तालुका पत्रकार
संघाच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. सभापती रमजान तांबोळी यांचे
सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,माजी
सरपंच अनिलतात्या ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य योगेशशेठ भंडारी, डाॕ.संतोष जाधव,
पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,पत्रकार डॉ.प्रा.विनोद ढोबळे,पत्रकार शरद
तळेकर, पत्रकार सचिन रानडे,पत्रकार गणेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या