

आष्टी (प्रतिनिधी)
समता,बंधुत्व,ऐक्य आणि सर्व धर्म समभाव हे मूल्य जनतेमध्ये
अहोरात्र पेरण्याचे दिव्य कार्य आयुष्यभर करून भाविक आणि भक्तीचा मळा फुलविणारे
ऐश्वर्य संपन्न संत वै.वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यभूमी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर
राज्यातून भाविक भक्त आशीर्वादासाठी नतमस्तक होतात.या भाविक भक्तांची
येण्या-जाण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथून गडावर
येण्यासाठी बस सेवा सुरू करावी अशी जाहीर मागणी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री
यांनी तात्काळ आदेश देऊन ही बस सेवा सुरू झाल्याने भाविक भक्तात आनंदाचे वातावरण
निर्माण झाले आहे.घाटशीळ पारगांव येथे संत वामनभाऊ यांनी सुरु केलेल्या नारळी
सप्ताह नुकताच शिरुर तालुक्यातील घाटशीळ पारगांव येथे भव्य दिव्य ९३ वा. नारळी
सप्ताह संपन्न झाला.या सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास महाराष्ट्राचे लोकप्रिय
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राज्याच्या
पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे,आ.सुरेश धस,आ.मोनिका
राजळे,आ.नमिता मुंदडा, माजी आ.भीमराव धोंडे,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मण
हाके,प्रताप ढाकणे,बीड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शंकर देशमुख,समीर काझी,विभागीय
आयुक्त गावडे, जिल्हाधिकारी पाठक हे उपस्थित होते.यावेळी महंत विठ्ठल महाराज यांनी
श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते मुंबई अशी बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी
गडाच्यावतीने केली.ही मागणी तात्काळ मंजुर केली.सोमवार दि.२१ एप्रिल रोजी या
बससेवेचा शुभारंभ झाला. घाटशीळ पारगावचा सप्ताह संपताच दोन दिवसांत बस सुरु
झाली.श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ९३ व्या. नारळी सप्ताहच्या समारोपप्रसंगी दि.
१९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र गहिनीनाथगडाची
संपुर्ण जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली होती.अवघ्या दोन दिवसात वारक-यांच्या
सोयीसाठी मुंबई परेल ते श्री क्षेत्र गहिनीनाथगड ही बस सुरु केली.आज मुंबई ते श्री
क्षेत्र गहिनीनाथगड या नूतन बसचा शुभारंभ झाला.बस गडावर येताना जागोजागी प्रत्येक
गावामध्ये स्वागत झाले.बस गडावर आल्यानंतर गाडीची विधिवत पूजा करण्यात आली.या
पहिल्या बस चालक व वाहकाचा महंत श्री ह.भ.प. विठ्ठल महाराज यांनी संप्रदायिक फेटा
शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. याप्रसंगी श्री क्षेत्र गहिनीनाथगडाचे महंत श्री
ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज शास्त्री उपस्थित होते. गहिनीनाथगडाचे सचिव श्री ह.भ.प.
विष्णुपंत महाराज वनवे तसेच चिंचोली ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
--------
राजधानीतील भक्तांना
वामनभाऊंचे दर्शन सुलभ!
---------------
मुंबई ते श्रीक्षेत्र
गहिनीनाथगड अंतर ४०० कि.मी.च्या आसपास आहे.या दूरच्या अंतरावरून भावी भक्त संत
वामनभाऊ महाराजांच्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरील पवित्र चरणी नतमस्तक होण्यासाठी
उत्सुक असतात.वाहनाच्या गैरसोयीमुळे त्यांची दमछाक व्हायची.परंतु आज मुंबई ते श्री
क्षेत्र गहीनाथगड बस सेवा सुरू झाल्याने दर्शन सोपे झाल्याबद्दल भक्तांनी
मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
कल्याण ते गहिनीनाथगड दुसरी बससेवाही सुरु
-------------
कल्याण - आळेफाटा -अ.नगर -दौलावडगाव मार्गे ते गहिनीनाथगड अशी
बससेवाही आजपासुन सुरु झाली असल्याची माहिती ह.भ.प. विष्णु महाराज वनवे यांनी
दिली.गहिनीनाथगडवरुन कल्याणसाठी ही बस २.३० वा.निघेल व गहिनीनाथगडावर दुपारी १ ते
१.३० पोहचेल असे वेळापत्रक आहे.
-----------------
0 टिप्पण्या