
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील केळसांगवीच्या पोलीस हवालदाराच्या मुलाचा
युपीएससी परिक्षेत झेंडा लावला आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जाणाऱ्या
युपीएससी परीक्षेत आष्टी तालुक्यातील केळसांगवी गावचे सुपुत्र प्रथमेश वर्षा सुंदर
बोराडे या तरुणाने ९२६ क्रमांकाने यश संपादन करून युपीएससी परीक्षेत बाजी मारली
आहे. विशेष म्हणजे वडील पोलिस हवालदार असून प्रथमेश ने मराठी माध्यमात प्राथमिक
शिक्षण घेतले आहे.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चांगला अभ्यास केला आणि सर्वसामान्य
कुटुंबातील तरुणाने युपीएससी परीक्षेत झेंडा रोवला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने
घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा - २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये आष्टी
तालुक्यातील केळसांगवी गावचे सुपुत्र प्रथमेश बोराडे यांनी ९२६ वे. स्थान मिळवले
आहे.मात्र हा प्रवास सोपा नव्हता केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा म्हणजे यश अपयश
हिंदोळा आहे.प्रथमेश यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हा टप्पा पार पाडत
उल्लेखनीय यश संपादन केले आहे.प्रथमेश ने मराठी माध्यमांमध्ये प्राथमिक शिक्षण
घेतले माध्यमिक शिक्षण शारदाश्रम विद्या मंदिर मराठी माध्यममध्ये झाले.गुरुनानक
कॉलेज सायन कोळीवाडा येथून पदवीधर झाले.हे सर्व सुरू असताना लोकसेवा आयोगाच्या
परीक्षेची तयारी होती.आयोगाच्या २०२४ पूर्व परिक्षेसाठी १३.४ लाख विद्यार्थी बसले
होते.त्यातून १४६२७ विद्यार्थी मुख्य परिक्षेसाठी उत्तीर्ण झाले.पैकी मुलाखती साठी
२८४५ उमेदवार पात्र झाले.त्यांच्या मुलाखती होऊन प्रथमेश ने ९२६ वे स्थान मिळवले,
वडील हे महाराष्ट्र पोलीस मध्ये हवालदार या पदावर कार्यरत असून आई देखील शिक्षिका
आहे.आई वडीलांच्या पाठिंब्यामुळे यशाची वाट सापडल्याची भावना प्रथमेश बोराडे यांनी
व्यक्त केली.या यशाबद्दल मा.शिक्षण अधिकारी भीमराव बोराडे,सरपंच परिवंत गायकवाड,
सरपंच अजित घुले, राजेंद्र बोराडे,विजय बोराडे,दत्तात्रय घुले (सर),श्याम बोराडे,
ज्ञानेश्वर पडोळे (उपसरपंच),संदीप भोसले, हर्षल घुले, गोवर्धन घुले, विकास बोराडे
आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या