
आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सातत्याने आघाडीवर असणार्या आणि शिरूर कासार पाटोदासह भागामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष ॲड.भाग्यश्रीताईं ढाकणे-चेमटे यांचा शेवगाव येथे हिंदी साहित्य क्षेत्रातील अभ्यासक तसा आदर्श शिक्षिका श्रीमती आशाताई चाटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता सत्कार करण्यात आला.ॲड. भाग्यश्री ढाकणे या गेल्या दोन दशकापासून विशेषतः महिलांचे प्रश्न गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर तसेच सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन कार्यरत असतात.एकता फाउंडेशनच्या सल्लागार म्हणून काम करतानाही त्यांनी साहित्य क्षेत्रात सेवा केली आहे. राजकारणात उच्च पदावर प्रमाणिकपणे कर्तव्य निभावताना त्यांनी सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून दिलेले आहे.शिरूर कासार तालुक्यामधील भूमिपुत्र असलेल्या सुप्रसिद्ध विधीज्ञ श्रीमती भाग्यश्री ढाकणे यांनी पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय सामाजिक कार्य करण्याची त्यांची अनेक वर्षापासूनची पद्धत आहे.याबद्दल त्यांना सर्वसामान्य जनतेतून धन्यवाद दिले जातात.
चौकट
--------
हिंदी साहित्य क्षेत्रात स्त्रियांच्या प्रश्नावर 'जोहरा- एक मूल्यांकन' या कादंबरीच्या रूपाने लेखन करणाऱ्या आदर्श शिक्षिका तथा साहित्यिक श्रीमती आशाताई चाटे यांच्या कादंबरीचे अवलोकन करून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्ष ॲड. भाग्यश्रीताईं ढाकणे यांनी त्यांचे कौतुक केले
0 टिप्पण्या