आष्टी (प्रतिनिधी)
शिरूर तालुक्यातील वारणी गावाचे भूमिपुत्र अभिनेते विष्णू केदार यांनी आतापर्यंत सुमारे ६१ चित्रपटांमध्ये आपल्या छोट्या
मोठ्या भूमिका साकारल्या आहेत तसेच ३० लघु चित्रपटात आपल्या भूमिका साकारल्या आहेत.नुकतीच प्रवेशित झालेली लुना एक्स एल १००
या लघु चित्रपटाला पुरस्कार मिळाला असून यामध्ये विशेष भूमिका साकारल्याने अभिनेता विष्णू केदार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.केदार यांनी आतापर्यंत छत्रपती शासन, सर्जा,मुळशी पॅटर्न, इलू इलू ,अप्सरा, लगण यासारख्या
चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. हवालदिल,मेसवाली रुपाली तर लुना एक्स एल १०० या
लघुचित्रपटाला मुंबई येथे उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
मिळाला आहे.केदार हे सर्वसामान्य कुटुंबातील असून गिरणी चालक म्हणून ते परिचित होते पण त्यांना चित्रपटसृष्टी खुणावत होती आणि गावात सुध्दा मन लागत नव्हते पण शेवटी त्यांनी निश्चय करून
पुणे गाठले गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चित्रपट सृष्टीतील जाणकारांचा भेटीगाठी घेणे
व त्यातून काम मिळवणे अशाप्रकारे ते संघर्ष करत आहेत आतापर्यंत त्यांनी अभिनेते संतोष
जुवेकर,धुमाळ काका,अनिल नगरकर,पृथ्वीराज
थोरात,प्रसाद ओक, किशोर कदम,उषा
नाईक,ऐली ओराम,

किरण गायकवाड,
भाऊसाहेब शिंदे, मिलिंद शिंदे,रोहित चव्हाण,प्रकाश पवार आदी कलाकारासोबत तर दिग्दर्शक भाऊराव कराडेसारख्या दिग्दर्शकासोबत काम केले आहे. अभिनेता विष्णू केदार यांना एनएसएसएफ मुंबई यांच्यावतीने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता
पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे त्यांचे
निर्माता दिग्दर्शक अभिनेता भारतकुमार पानसंबळ,अभिनेता बाळकृष्ण मंगरुळकर,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,विजय गाडेकर,पत्रकार गोकुळ पवार,सतीश मुरकुटे,अंगद पानसंबळ,प्रतीक भांडेकर,शाहेबाज पठाण,प्रमोद निकम,सर्पमित्र महेश औसरमल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या