Ticker

6/recent/ticker-posts

ज्या देशात कट्टर धर्मवाद्यांची संख्या वाढते; तो देश धोक्यात येतो .......... प्रा.मुक्ता कदम यांच्या 'भीम संदेश पर्व- २०२५' मधील व्याख्यानाला मोठा प्रतिसाद

आष्टी (प्रतिनिधी‌) आपण प्रत्येक जण सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन लढू शकत नाहीत किमान देशात काय चाललंय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत नोंदवू शकतो. राष्ट्रपुरुषांचे विचार प्रसार करू शकतो. स्वतःसाठी जगताना इतरांचाही विचार करा असे सांगून ज्या देशात कट्टर धर्मवाद्यांची संख्या वाढते त्या देशाचे भविष्य धोक्यात असते अशी भीती संविधान प्रचारक तथा ज्येष्ठ पत्रकार व्याख्यात्या प्रा.मुक्ता कदम यांनी व्यक्त केली. आष्टी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित भीम संदेश पर्व २०२५ मधील शनिवारी झालेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रा.मुक्ता कदम अनेक उदाहरणेसह संवाद साधत होत्या.प्रारंभी भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राष्ट्रपुरुष व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सरपंच परिवंत गायकवाड, उपाध्यक्ष अरुण कांबळे,सचिव नवनाथ लोढे, सहसचिव राहुल वाल्हेकर,कोषाध्यक्ष सीताराम घोडके, अरुणभैय्या निकाळजे,कवी प्रा,सय्यद आल्लाउद्दीन, प्राचार्या सीमा नागसेन कांबळे,डाॕ. सय्यद,सादीक कुरेशी,दिपक निकाळजे,ॲड. रत्नदीप निकाळजे, ॲड.डी.एस.ससाणे,सेवानिवृत गटविकास अधिकारी पदी बबनराव खंडागळे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,राजेंद्र लाड, जयदत्त गायकवाड, महालिंग निकाळजे, सुनिल शिंदे,अण्णा साबळे,रूपेश निकाळजे,कडा कृ.उ.बा.समितीच्या संचालिका सौ.वंदना गायकवाड,रत्नकांत निकाळजे,ॲड. सतीष गायकवाड, अशोक निकाळजे, मिलींद निकाळजे आदि सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रा.मुक्ता कदम पुढे म्हणाल्या की, आपल्याला काय करायचय ? ही भावना सोडुन द्या.. संवेदनशीलता असु द्या .. स्वार्थ सोडुन द्या दुसऱ्यासाठी जगा.. राष्ट्रपुरुष, महामानव हे इतरांसाठी जगले आहेत,थोर सुधारक हे कृतीतुन सुधारक बनतात.आता आपण सीमेवर जाऊन हातात बंदुका घेऊन लढवु शकत नाहीत पण देशात काय चाललयं हे अपले मत सोशल मिडियाच्या माध्यमातून नोंदवु शकतोत, सभोवतली जे चाललयं,घडतयं त्यावर बिनधास्त प्रतिक्रिया द्या..तरच अपण डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी ठरतो. दंगे घडविणारे चित्रपट टॅक्स फ्री-खंत ------------------ एकोपा दाखविणारे चित्रपट टॕक्स फ्री हवेत परंतु दुदैवाने हिंदु -मुस्लीम दंगे दाखविले जातात ते चित्रपट टॕक्स फ्री होतात. हे शासनाचे चुकीचे धोरण आहे अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.ज्या देशात कट्टर धर्मवादी माणसांची संख्या वाढली तो देश धोक्यात येतो.हा इतिहास आहे.मन निर्मळ असेल व तरच प्रवचन करावे. बोलके नव्हे, करते सुधारक व्हा! ----------------- कोणत्याच राष्ट्रपुरुषांनी "आपल्याला काय करायचयं? "असा संकुचित विचार केला नव्हता.त्यांनी समाज प्रबोधन केले.फक्त बोलके सुधारक न बनता कर्ते सुधारक होते, समजातील दुर्बल, वंचीत,गरीब लोकांच्या उध्दारासाठी जीवावर उदार होऊन समाजसेवा केली आहे म्हणूनच ते महामानव, राष्ट्रपुरुष झालेले आहेत. सुनिता विल्यम अंतराळातून येताना कबरीच्या बातम्या! ------------------- प्रसार माध्यमाबाबत नाराजी व्यक्त करताना प्रा.मुक्ता कदम म्हणाल्या की,सुनिता विल्यम अंतराळतुन येत असताना टि.व्हि. वाले औरंगजेबची कबर याच्या बातम्या जास्त दाखवत होते. ऊलट सुनिता विल्यमच्या जास्त बातम्या दाखवल्या असत्या तर लहाण मुलांनी त्या बातम्या पाहुन प्रेरणा घेऊन तसे स्वप्न,आपले ध्येय ठेवले असते. परंतु तसे झाले नाही हे दुदैव आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या बातम्याला जास्त महत्व चॕनलवाल्यांनी दिले. प्रयागराज येथे महाकुंभमेळा झाला कोट्यावधी भावीक गंगास्नानाला गेले.तेथे गंगा कीती घाण झाली होती कुठल्यतरी मिडियातील चॕनलवाल्यांनी दाखविले का? गंगा स्नानच करायचे ना मग जा हरिव्दारला तेथे स्वच्छ गंगा आहे.परंतु प्रयागराजला विष्टा मिसळलेले पाणी झाले होते असा प्रदुषण मंडळचा अहवाल आला आहे. " चुकीला चुकच म्हटले पाहिजे,चांगल्याला चंगलेच म्हणता आले पाहिजे.. ही आपली नागरिकांची जबाबदारी आहे. " कशाला जाऊ द्या " म्हणु नका आणि तसे केले तर महापुरुषांच्या विचारांशी आपण गद्दारी करतोय असे होईल असे प्रतिपादन संविधान प्रचारक तथा पत्रकार प्रा.मुक्ता कदम यांनी काल आष्टीत व्याख्यान देताना केले. चौकट -------- देश चुकीच्या दिशेने जात असल्याची भीती! ------------------ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त आयोजित भीम संदेश पर्वत- २०२५ मध्ये आज प्रा. मुक्ता कदम यांचे व्याख्यान झाले. प्रचंड मोठी संख्या होती.प्रा.मुक्ता कदम यांनी केलेल्या भाषणातून देशात संतुलित समाज रचना निर्माण होण्याऐवजी धर्म, पंथ,जाती यावर अधिक भाष्य करून मूळ मुद्दे बाजूला ठेवले जात असून ही भविष्यातील देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक बाब असल्याची भीती त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाली. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या